scorecardresearch

Premium

Video: आलियाच्या गाण्याला जर्मन तडका, पटाखा गुड्डी गाण्यावर तरुणींची धम्माल

“Ali ali ali ali,” हे कॅप्शन दिलेल्या या रीलला १० लाखाहून अधिक व्ह्यूज व १.५ लाख लाईक्स आहेत.

Viral Reel On Patakha Guddi
Viral Reel On Patakha Guddi (फोटो: Instagram/ palinapaleeva)

गंगुबाई काठियावाडी नंतर Mommy to be आलिया भट्टच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. वंडर वुमन म्हणजेच गॅल गॅडोट सह Heart of Stone या आगामी हॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून आलिया हॉलिवूड मध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. जगभरात इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या आलियाच्या अनेक गाण्यांवर तसेच गंगुबाईच्या डायलॉगवर रील्स तुफान व्हायरल होत आहेत. पण या साऱ्यात आलियाच्या Highway चित्रपटातील पटाखा गुड्डी या गाण्यावरची एक रील सध्या नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली आहे. जर्मन डान्सर पलिना पलीवा व तिची मैत्रीण एमिलीया या दोघींनी पटाखा गुड्डीच्या बिट्स वर भर रस्त्यात ठेका धरला आणि त्याची जबरदस्त मूव्हज आता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

पटाखा गुड्डी वरील या Viral Reel मध्ये पलिना व एमिलीया यांचा कमाल ताळमेळ पाहून तुम्ही सुद्धा त्यांचं कौतुक कराल. “Ali ali ali ali,” हे कॅप्शन दिलेल्या या रीलला १० लाखाहून अधिक व्ह्यूज व १.५ लाख लाईक्स आहेत. यावर अनेकांनी कमेंट करून तुम्हाला डान्स करताना बघूनच माझे गुडघे दुखायला लागले असे म्हण्टलंय, आता असं का ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर कळेलच.. चला तर पाहुयात..

sachin tendulkar share post on x about junabai tigress in Tadoba-Andhari Tiger Project
‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान
delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
haridwar viral video marathi
Video: कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला गंगेत बुडवून ठेवलं; चिमुकल्याचा दुर्दैवी अंत!
Maratha survey Buldhana district
मराठा सर्वेक्षण ठरतंय अडथळ्याची शर्यत! आठवड्यात साडेसहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान; आयोगाच्या सदस्या बुलढाण्यात मुक्कामी

आलियाच्या गाण्याला जर्मन तडका

‘मी पती म्हणून नव्या नोकरीत रुजू होतोय’… कॉमेडियन अनमोल गर्ग याची मजेशीर LinkedIn पोस्ट चर्चेत

यापूर्वी कतरिनाच्या काला चष्मा या गाण्यावर नॉर्वेच्या ‘Quick Style’ या डान्स ग्रुपचा व्हिडीओ सुद्धा प्रचंड गाजला होता. जून महिन्यात एका मित्राच्या लग्नादरम्यान या ग्रुपने बॉलिवूड बिट्स वर कमाल स्टेप्स करत सर्वांना त्यांच्या प्रेमात पाडले होते. आमच्या मित्राच्या लग्नात कतरीना येऊ न शकल्याने त्याच्यासाठी आम्हीच कतरीना बनलो असे म्हणत यासिन नावाच्या ग्रुप मेंबरने हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला सुद्धा कोट्यवधी व्ह्यूज व लाखो लाईक्स आहेत.

Kala Chashma Norway Group डान्स

असं म्हणतात की कलेला देशाच्या सीमा नसतात हे व्हिडीओ पाहता हे वाक्य खरंच आहे. तुम्हाला हे व्हायरल व्हिडीओ आवडले का नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt patakha guddi song watch viral reel of german girls dancing svs

First published on: 06-08-2022 at 12:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×