Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात पण पारंपारिक डान्सची कुठेही तोड नाही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.सध्या सोशल मीडियावर जोगव्याचा एक व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये जोगवा नृत्याची सुंदरता आणि त्यातल्या उत्साही शैलीला पाहून लोक आश्चर्यचकित होऊन त्या व्हिडिओला पसंती देत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा आणि लोककलांना नवीन पिढीला समजून घेण्याची संधी मिळत आहे.

‘जोगवा’ हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. यल्लमा देवीकडे जोगवा मागण्याची पद्धत आहे. जोगते आणि जोगतिण हा जोगवा मागत असतात. ‘जोगवा’ नावाचा मराठी चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातली सगळी गाणी लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटातलं ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं कुठेही ऐकलं की आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यात एक तरुण आणि काही तरुणी भर रस्त्यावर ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर जोगवा डान्स करत आहेत. तरुणी नऊवारी साडी घालून डान्स करताना दिसत आहेत, तर सगळ्यात पुढे असलेल्या तरुणाने पांढरा कुर्ता आणि पायजामा परिधान केलेला आहे.

सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून या तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. भर रस्त्यात केलेला या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. लहान मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्सच्या स्टेप्स करतात आणि मग पाहुण्यांपुढे त्या सादर करुन दाखवतात. सुट्टीच्या दिवसांत तर लाहन मुलींसाठी हा एक उद्योगच असतो. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ५ मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहे