Ambani to Donate 300 kg gold: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आज भारतामध्ये दाखल झाल्या. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पती आनंद परिमल यांच्याबरोबर इशा पहिल्यांदाच मायदेशी परतल्या आहेत. १९ नोव्हेंबर रोजी मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचं आजी-आजोबा म्हणून प्रमोशन झालं. इशा यांच्या मुलाचं नाव कृष्णा आणि मुलीचं नाव आदिया असं आहे. ही दोन्ही मुलं एका महिन्याची झाल्यानंतर आज इशा त्यांच्याबरोबर मायदेशी परतल्या असल्याने अंबानी कुटुंबियांनी लेकीच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली आहे. अंबानी आणि परिमल यांची घरांना रोषणाई करण्यात आली आहे. ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’ची सजावट करण्यात आली आहे. इशा अंबानीचं स्वागत करण्यासाठी तिचा भाऊन आकाश अंबानी विमानतळावर पोहोचला होता.

इशा अंबानी आणि आनंद परिमल हे मुलांच्या जन्मानंतर पहिल्यांदाच भारतात येत आहेत. त्यांच्या स्वागताची मागील काही दिवसांपासून दोन्ही घरांमध्ये लगबग सुरु होती. मुकेश अंबानी आणि निता अंबानींनी या चौघांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य कार्यक्रमांबरोबरच जय्यत तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

इशा आणि त्यांच्या जुळ्या मुलांना भारतात परतण्यासाठी कतारमधून विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचंही वृत्त आहे. हे विमान स्वत: कतारच्या राजाने पाठवलं असून कतारचा राजा आणि अंबानी यांची घरोब्याचे संबंध आहेत. इशा यांच्याबरोबर या विमानामध्ये प्रशिक्षित डॉक्टर्सचीही ही एक टीम होती. हे चौघेही लॉस एंजलिसवरुन कतारमार्गे भारतात परतले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या अमेरिकेतील सर्वोत्तम डॉक्टर्सपैकी एक असलेले डॉक्टर गिबसनही या विमानामध्ये होते. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातील मोठ्या मंदिरांमधील मान्यवर पुजाऱ्यांना आज इशा आणि आनंद परिमल यांच्या वरळीमधील घरी या जुळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. ‘करुणा सिंधू’ या निवासस्थानी धार्मिक सोहळा पार पडणार आहे. अंबानी या निमित्ताने ३०० किलो सोनं दान करणार आहेत. या कार्यक्रमामधील खाद्य पदार्थही फार खास असणार आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून विशेष स्वयंपाक्यांना बोलवण्यात आलं असून विशेष प्रसाद तयार केला जाणार आहे. यासाठी तिरुपती बालाजी मंदिर, नथद्वारामधील श्रीनाथजी, द्वारकाधीश मंदिरातील प्रसादाप्रमाणे प्रसाद बनवला जाणार आहे.