Amchya Pappani Lai Mala Hanla Video: यंदाच्या गणेशोत्सवाच्या काहीच दिवस आधी ‘साईराज केंद्रे’ या चिमुकल्याचा ‘आमच्या पप्पानी गणपती आणला’ गाण्यावरील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला, एवढंच नव्हे तर या गाण्यावर मग हजारोंच्या संख्येत रील बनवण्यात आले. आपल्या गोड बाललीलांनी सर्वांना मोहवून साईराज केंद्रे रातोरात अख्ख्या देशात व्हायरल झाला. आता अर्थात एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याच्या अनेक पॅरडीज येणार हे ही निश्चितच असतं. तसंच आता आमच्या पप्पांनी गंपती आणलाचं भन्नाट व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारतात iPhone १५ लाँच झाल्यावर तर हे रील अजूनच आपलंस वाटू लागलं आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडीओ चला पाहूया…

ओंकार शिंदे आणि सुदर्शन शिवकुमार या दोन पठ्ठ्यांनी हा भन्नाट रील बनवला होता. यामध्ये त्यांनी व्हायरल गाण्याची चाल व शब्द काही प्रमाणात सारखेच ठेवून त्याला आपला भन्नाट ट्विस्ट दिला आहे. हॅलो गाईज, iPhone कॅन्सल झाला गाईज, बाय गाईज असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. गणपतीच्या गाण्यात आयफोन अचानक कुठून आला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, तर हा व्हिडिओ पाहूया..

Video: “आमच्या पप्पांनी पळू पळू हाणला.. “

हे ही वाचा<< Jugaad Video: दारावर कडी नाही नुसतं बाटलीचं झाकण आणि मग.. ; ४ कोटी लोकांनी पाहिला पठ्ठ्याचा जुगाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून या दोघांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं आहे. आम्ही खूप हसलो दादा असं म्हणत अनेकांनी त्यांना शाबासकी दिली आहे. तर काहींनी मजेशीर कमेंट करत, ‘गाणं अस एडिट करा की ओरिजिनलच फेक वाटले पाहिजे’, ‘तुम्हाला एखादा पुरस्कार फेकून हाणला पाहिजे’ अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळपास १३ लाख लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा.