American Woman Video Viral : अमेरिकेतली एक महिला सध्या भारतात राहते आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिचं म्हणणं आहे की माझं भारतावर प्रेम आहे पण इथे राहण्याबाबत काय वाटतं ते तिने या व्हिडीओत सांगितलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिलेचं नाव क्रिस्टीन फिशर असं आहे. ही महिला दिल्लीत मागच्या चार वर्षांपासून वास्तव्य करते आहे.
काय म्हटलंय या महिलेने?
“मी एक परदेशी व्यक्ती म्हणून भारतात राहते आहे. मात्र मला हे सांगायला मुळीच कमीपणा वाटणार नाही की कुठलीही जागा परफेक्ट नसतेच. I Love India पण तरीही हा देश काही परफेक्ट आहे असं नाही. काही गोष्टी मला खूप आवडल्या काही अजिबात नाही आवडल्या. पण आपण जिथे राहतो तिथे आनंद निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. बाकी कमी अधिक फरकाने गोष्टी तर सगळीकडे होतातच.” असं या महिलेने म्हटलं आहे. क्रिस्टीन फिशर असं या महिलेचं नाव आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
क्रिस्टीनने तिला काय वाटतं त्याची एक यादीच लिहिली आहे
१) भारतात माझं कुटुंब नाही, मी त्या सगळ्यांना मिस करते आहे
२) मला इथे भारतीय पद्धतीचं जेवण मिळतं आहे जे मला आवडतं आहे.
३) मला वाटतं आहे की मी इथे अल्पसंख्याकांप्रमाणे राहते आहे.
४) मला दिल्लीचं प्रदूषण अजिबात आवडलेलं नाही
५) भारत हा लहान मुलांसाठी खूप उत्तम देश आहे
६) भारतात बहुतांश लोक शाकाहारी भोजन करतात आणि ते उत्तम आहे.
७) भारत हा वैचारिक दृष्ट्याही पुढारलेला देश आहे
८) रस्त्यावर ठेवलेल्या कचऱ्याच्या पिशव्या पाहून मला चिड येते
९) भारतात मिळणारं जेवण हे पौष्टिक आहे
१०) भारतात तुमचं आगतस्वागतही खूप छान पद्धतीने केलं जातं.
११) भारतात शेती हा व्यवसाय आहे आणि तो कष्टाचा असला तरीही खूप चांगला आहे.
भारत हा परिपूर्ण देश आहे असं मला वाटत नाही-क्रिस्टीन
या अकरा गोष्टींची यादीत क्रिस्टीनने तिच्या व्हिडीओत सादर केली आहे. भारत हा एक परिपूर्ण देश आहे असं मला मुळीच वाटत नाही. पण आपल्याला जिथे आहोत तिथे आनंद शोधावा लागतो. तसाच मी देखील इथे आनंद शोधला आहे. क्रिस्टीनच्या या व्हिडीओ १ लाख २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट दिल्या आहेत.
लोक काय म्हणत आहेत?
क्रिस्टीनने पोस्ट केलेला व्हिडीओ अनेकांना भावला आहे. अनेक युजर्स म्हणत आहेत तू आमच्या देशाचं योग्य वर्णन केलं आहे. भारत हा काही परिपूर्ण देश नाही पण आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की तू इथे येऊन आपण आहोत त्यात आनंद शोधला पाहिजे असं म्हटलं आहे ही बाबच खूप सकारात्मक आहे. क्रिस्टीन दिल्लीत मागच्या चार वर्षांपासून राहते आहे. मात्र दिल्लीत राहून आपल्याला काही वाईट वाटलेलं नाही किंवा पश्चात्ताप झालेला नाही असंही तिने आवर्जून सांगितलं. मागच्या चार वर्षात मी विलक्षण लोकांना भेटले. अनेक भागांमध्ये भेटी दिल्या. तसंच उत्तम प्रकारच्या जेवणाचा, खाण्यापिण्याचा आस्वाद घेतला असंही ती सांगते.