Man Cut the Amit Shah Kite :गुजरातचा पतंग महोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बडे नेते, सेलिब्रिटी पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसले आहेत. दरम्यान, गुजरातमधल्या या पतंग महोत्सवातील एक व्हिडीओने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह हेही पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. त्यावेळी एक तरुण त्यांचा पतंग कापून जल्लोष करतानाही दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता सोशल मीडियावरील युजर्स वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स करीत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण घराच्या छतावर उभा राहून पतंग उडवताना दिसत आहे. यावेळी दुसऱ्याच्या पतंगाचा दोर कापल्यानंतर तो आनंदाने ओरडू लागतो. यावेळी जेव्हा कॅमेरा दुसऱ्या इमारतीच्या छताच्या दिशेने वळतो तेव्हा तिथे गृहमंत्री अमित शाह पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतात. यावेळी तो गुजराती भाषेत सांगतो की, त्याने गृहमंत्री अमित शाह यांचा पतंग कापला. यावेळी तरुणाबरोबर असलेले इतर लोकही आनंदाने ओरडू लागतात. त्या तरुणाचा आनंद पाहून अमित शाह हसत हसत त्याला ‘थम्ब्स अप’ देताना दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थंडीत पेटवलेल्या शेकोटीजवळ बसणे कुटुंबाला पडले महाग; अचानक घडले असे काही की…; पाहा धक्कादायक VIDEO

अमित शाह यांच्या या पतंगबाजीच्या व्हिडीओवर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. विशेषत: अमित शाहांच्या पतंगाचा दोर कापणाऱ्या तरुणावर युजर्स मजेशीर कमेंट्स करीत आहेत. काही युजर्सनी लिहिले, “भावा, आता ईडी, सीबीआय आणि बुलडोझर लवकरच तुझ्या घरी येणार..” तरी युजर्सनी त्याला गमतीत, “आता सांभाळून राहा” असे म्हटले आहे. अशा प्रकारे युजर्स एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करीत आहेत.