हत्ती हा प्राणी समूहामध्ये राहतो. ते एकत्र जंगलामध्ये फिरताना दिसतात. बुद्धिमत्ता आणि त्यांच्या भावनिकतेसाठी ते ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर एका हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका नॅशनल पार्कमध्ये हत्तीणी आपल्या बाळाला पर्यटकांच्या जवळ जाण्यापासून वाचवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून प्राणीही अगदी माणसांप्रमाणेच आपल्या पिलांची काळजी करतात हे दिसून येते.

बुईटेंगबिडेन यांनी ट्विटरवरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हत्तीण तिच्या बाळाला पर्यटकांकडे जाण्यापासून रोखते.” व्हिडीओमध्ये आई आपल्या मुलाला पर्यटकांजवळ जाण्यापासून थांबवताना दिसत आहे. एखादी आई आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तीपासून दूर राहायला सांगते, अगदी त्याचप्रकारे ही हत्तीण आपल्या पिलालाही सांगत असल्याचे वाटते.

Photos : आता YouTubeवर विना जाहिराती बघता येणार Video; फक्त करा ‘हे’ काम

क्लिपमध्ये हत्तीण आणि तिचे पिल्लू रस्ता ओलांडताना दिसत आहे. मात्र, हे पिल्लू पर्यटकांना पाहिल्यानंतर त्यांच्या दिशेने जाऊ लागले. हत्तीणीने पटकन आपल्या बाळाला पर्यटकांपासून दूर केले आणि त्याला तिच्या सोंडेने मागे घेतले. शेवटी, सफारीवर गेलेल्या पर्यटकांना अत्यंत नम्रतेने मुलाजवळ न जाण्याची ताकीद देण्यात आली.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही खुश झाले आहेत. एका युजरने लिहले, “हा व्हिडीओ अतिशय गोड आहे. सर्व माता आपल्या मुलांचे रक्षण करतात.” हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला ७६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.