scorecardresearch

Premium

“प्रेम म्हणजे काय असतं, बायकोला महागडी गिफ्ट देणं असतं?” महिलेने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO पाहाच

सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने उखाणा सांगताना प्रेम म्हणजे काय असतं, हे एका वेगळ्या अंदाजात सांगितले आहे.

a woman told what is love in ukhana
महिलेने घेतला भन्नाट उखाणा (Photo : Instagram)

Viral Video : उखाणा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. शुभप्रसंगी किंवा लग्न समारंभात विवाहीत जोडप्याला उखाणा घेण्याचा अट्टहास धरला जातो. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे इतके मजेशीर असतात की ऐकून पोट धरुन हसायला येतं. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने उखाणा सांगताना प्रेम म्हणजे काय असतं, हे एका वेगळ्या अंदाजात सांगितले आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत एक महिला उखाणा सांगताना दिसत आहे आणि इतर अनेक महिला खाली बसून या महिलेचा उखाणा ऐकताना दिसत आहे.
उखाणा घेताना महिला म्हणते, “प्रेम प्रेम प्रेम म्हणजे काय असतं, बायकोला महागडी गिफ्ट देणं असतं? सोन्या नाण्याने मढवणं असतं? की ती काय म्हणेल ते ऐकणे असतं? बायकोला भिणं असतं? प्रेम तर हे नसतं? मग प्रेम म्हणजे काय असतं? आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे कारण माझ्या पाठीवरती होता माझ्या नवऱ्याचा हात, आनंदरावांचे नाव घेते कारण त्यांची मला आहे कायम साथ” महिलेचा हा सुंदर उखाणा ऐकून तेथे खाली बसलेल्या महिला टाळ्या वाजवताना आणि ‘वाह वाह’ म्हणताना व्हिडीओत दिसताहेत.

Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….
an old lady wish to do makeup before going to chemotherapy
उद्याची वाट पाहू नका, प्रत्येक क्षण जगा! केमोथेरपी करण्यापूर्वी आजीची होती मेकअप करायची इच्छा, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase
बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल

हेही वाचा : VIDEO : “खोया खोया चाँद खुला आसमान…” मुंबईच्या रस्त्यावर चालत्या रिक्षात गात होता चालक सुरेख गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

rachanand2512’या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरंच वेळेवर बनवलाय हा उखाणा. सर्व गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद अहो.”
रचना हे या महिलेचं नाव असून तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्ट्सचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी ताई” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरं आहे”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A woman told what is love in ukhana video goes viral on social media ndj

First published on: 30-11-2023 at 14:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×