इंटरनेटवर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. यातील बहुतेक व्हिडीओ गोंडस आणि मजेदार आहेत. पण, असे काही व्हिडीओ आहेत की, ज्यामुळे आपल्याला धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बैलाने एका व्यक्तीवर जोरदार हल्ला केला आहे. हा हल्ला बघून तुम्ही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक बैल रस्त्यावर उभा आहे आणि त्यावर पाणी पडत आहे. समोरच्या घराच्या छतावरून कोणीतरी त्याच्यावर पाणी फेकत असल्याचं दिसतंय. यानंतर बैल तिथून वळतो आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊ लागतो. पलीकडे जात असताना तो अचानक पळू लागतो.
Viral: प्रियकराला भेटण्यासाठी पोहत केले सीमोल्लंघन! बघा खऱ्या आयुष्यातील ‘अजब प्रेम की गजब कहाणी!’
त्या बाजूने एक दुचाकीस्वार आणि एक सायकलस्वार जात आहेत, ज्यांच्यावर तो हल्ला करण्यासाठी धावतो. यामध्ये दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगाने निघून जातो मात्र वृद्ध दुचाकीस्वार मागे राहतो. तो सायकलचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण ते अडखळतात, त्यामुळे सायकलचा वेग मंदावतो. तोपर्यंत बैल तिथे पोहोचतो. यानंतर काय झाले हे पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video
प्रेयसीने ब्रेकअप केल्यानंतर प्रियकराने तिचं अपहरण करुन चेहऱ्यावर गोंदवलं स्वत:चं नाव
व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, बैल वृद्धापर्यंत पोहोचताच त्याने सायकलस्वाराला त्याच्या सायकलसह शिंगांनी उचलून हवेत फेकले. यानंतर सायकल थोड्या अंतरावर पडली, तर ते वृद्ध बैलाजवळ पडले. बैल त्या वृद्धाला इतका जोरात मारतो की ते जमिनीवर पडताच बेशुद्ध होतात. ही गोष्ट काळजात धस्स करणारी आहे.