“होय, अमेरिकेत खरोखरच प्रतिभावंत लोक आहे आणि त्यापैकी बहुतांश प्रतिभावंत लोक भारतातून येतात आहे,” असे आनंद महिंद्रा यांनी ‘अमेरिकेच्या गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी झालेल्या भारतीय वंशाच्या मुलीचे कौतुक करताना ठामपणे सांगितले. प्रणयस्का ( Pranysqa ) मिश्रा जिचे वय फक्त ९ वर्ष आहे हिने टीना टर्नरचे आयकॉनिक गाणे ‘रिव्हर डीप माउंटन हाय’ सादर करत रिॲलिटी शोचे जज्ज प्रभावित झाले आहेत.

फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या प्रणयस्का हिला सुपरमॉडेल हेडी क्लम यांच्याकडून गोल्डन बझर देखील मिळाला, जी तिची कामगिरी पाहून अवाक झाली होती.

प्रणयस्काच्या कामगिरीने तितकाच आनंदित झालेल्या महिंद्राने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून खास कौतूक केले. त्याने पोस्ट करून “हे काय चालले आहे? दुसऱ्यांदा, गेल्या दोन आठवड्यांत, भारतीय वंशाच्या एका तरुण-खूप तरूणीने, कच्च्या प्रतिभेने @AGT वर स्टेजवर थिरकले आहे जे आश्चर्यकारक आहे. स्वदेशी अमेरिकन शैलीतील संगीतात मिळवलेल्या कौशल्यांसह. रॉक आणि गॉस्पेल. प्रणयस्का मिश्रा नऊ वर्षांची आहे.”

हेही वाचा – “मराठी तरुणीचा मराठमोळा नखरा! रशियामध्ये नऊवारी नेसून फिरतेय तरुणी, Viral Video पाहून नेटकरी झाले फिदा

प्रणयस्काच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती म्हणाली की,”तिची निवड झाल्यास ती तिच्या आजीला कॉल करेल. प्रणयस्काची अर्थातच तिची निवड झाली कारण तिने तिच्या आजीला भावनिक क्षणी व्हिडिओ कॉल केला.”

महिंद्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यांनी जेव्हा तिच्या आजीला कॉल केला तेव्हा माझ्या डोळ्यातही अश्रू आले.

हेही वाचा – जगातल्या टॉपच्या १० स्मार्ट शहरांमध्ये भारताचं एकतरी शहर आहे का? येथे पाहा यादी

आनंद महिंद्रा यांची पोस्ट येथे पहा:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या गॉट टॅलेंटच्या मंचावर परफॉर्म करताना “घाबरलेली आणि खरोखरच उत्साही” झालेल्या प्रणयस्काने सांगितले की तिच्याबरोबर तिचे आई-वडील आणि बहीण होते. प्रणयस्का मिश्राबरोबर, तिचे कुटुंब अश्रू अनावर झाले जेव्हा हेडी क्लम तिच्या “अविश्वसनीय” कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर गेली.