महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. या माध्यामातून ते विविध उपाय किंवा अन्य अनेक बाबी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी एका लहान मुलीने सुचवलेला उपाय शेअर केला होता. त्यानंतर ट्रॅक्टरच्या समोर एक खाट लावलेला व्हिडिओ शेअर करुन त्यांनी याचा वापर अनेक कामांसाठी करता येतो असा संदेश दिला होता आणि आता त्यांनी पुन्हा एकदा असाच एक पार्किंगच्या समस्येबाबत फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्रांना काही दिवसांपूर्वी एका महिलेने कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये प्लास्टिकच्या बॉटलचा वापर न करण्याचं आवाहन केलं होतं. महिंद्रांनीही त्या महिलेचं म्हणणं ऐकत प्लास्टिकचा वापर करणार नाही असं जाहीर केलं होतं. पण आता एक फोटो ट्विट करुन त्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे. या फोटोसोबत महिंद्रांनी “मी माझ्या ऑफिसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातलीये. अपेक्षा आहे की आजूबाजूच्या अनेक प्लास्टिक उत्पादनांनाही हे लागू होईल. मात्र, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी लोक असे भन्नाट प्रयोग करत आहे हे पाहून छान वाटतंय,”असं ट्विट केलंय.

महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एका पाण्याच्या प्लास्टिकच्या टाकीला कापून तिचा उपयोग दुचाकी पार्क करण्यासाठी करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात गाडी बाहेर उभी केल्यास अनेकदा गाडीला गंज लागणं किंवा तिचे इलेक्ट्रॉनिक भाग खराब होण्याचं प्रमाण वाढतं. त्यावर महिंद्रा यांनी सुचवलेला उपाय चांगलाच परिणामकारक आहे. एकप्रकारे प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यावरही महिंद्रा यांनी भर दिला असून महिंद्रा यांच्या या नव्या आवाहनाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra gives insight into a desi jugaad for parking woes sas
First published on: 21-07-2019 at 11:49 IST