महिंद्रा समुहाचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते सतत नवनवीन सोशल मीडिया ट्रेंड, देशी जुगाड यासारख्या व्हायरल व्हिडीओंची दखल घेत असतात. तसंच ते अनेकदा आपणाला योग्य वाटणाऱ्या गोष्टींवर आपले मत व्यक्त करत असतात. शिवाय नवीन तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य लोकांना फायदेशीर ठरतील अशा घटनांची दखल घेत त्या संबंधित काही फोटो, व्हिडीओ ते शेअर करत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांचा वेळ कसा वाचवता येऊ शकतो आणि ट्रॅफिकच्या समस्येपासून त्यांची कशी सुटका करता येवू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये डच लोकांनी महामार्गाखाली बांधलेल्या बोगद्याचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा बोगदा केवळ एका वीकेंडमध्ये बांधण्यात आला होता.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

हेही पाहा- जहाजातून उडी मारणं जीवावर बेतलं, पाण्यात पडायच्या आधीच शार्कने गिळलं; धक्कादायक Video व्हायरल

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “डच लोकांनी फक्त एका वीकेंडमध्ये महामार्गाखाली एक बोगदा बांधला! हे कौशल्ये आपण आत्मसात केली पाहिजेत. हे केवळ श्रम बचतीबद्दल नाही तर वेळेची बचत करणारही आहे. शिवाय उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठीही हे खूप महत्त्वाचे आहे. जलद पायाभूत सुविधा निर्मिती म्हणजे जलद वाढ आणि सर्वांना लाभ.”

हेही पाहा- डिजेचा कर्कश आवाज ठरला नवरदेवाच्या मृत्यूचं कारण, वधुच्या गळ्यात हार घातला आणि स्टेजवरच…

महिंद्रा यांनी हे ट्विट करताच नेहमीप्रमाणे त्यांच्या फॉलोवर्सना तो खूप भावला आहे. व्हिडीओमध्ये, एका रहदारीच्या महामार्गाखाली बोगदा बांधण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरु असल्याचं दिसत आहे. हा बोगदा बांधण्यासाठी अनेक जेसीबी आणल्याचं दिसत आहे. शिवाय हे काम रात्री आणि दिवसा सलग केल्याचं दिसत आहे. सुरुवातील जेसीबी वेगाने मुख्य महामार्ग खोदायला सुरुवात करतात. त्यानंतर एका लेवला तो खोदून पुर्ण झाला की तिथे बोगदा करतात. त्यानंतर काही वेळातच हा महामार्ग एका लेनसाठी वापरण्यायोग्य झाल्याचं दिसत आहे.

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ एक मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये एकाने लिहिलं आहे, “भारतात हे क्वचितच शक्य आहे.” तर आणखी एकाने हे खरंच खूप उत्तम टेक्निक आहे, असं केल्याने रस्त्यांच्या बांधकामुळे प्रवाशांना जो अनेक दिवस त्रास सहन करावा लागतो तो कमी होईल, असं लिहिलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, लवकरच आपल्याही देशात अशा वेगाने कामे केली जातील हिच अपेक्षा, असं म्हटलं आहे.