“अतुल्य भारत” कॅप्शन देत आनंद महिंद्रांनी ट्विट केला ‘हा’ सुंदर व्हिडीओ

मानवतेचा दाखला देणारा सुंदर व्हिडीओ नेटीझन्सलाही प्रचंड आडवला आहे.या व्हिडीओला आतापर्यंत १.१ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे.

Anand Mahindra tweeted beautiful video
आनंद महिंद्रांनी मोराचा सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे (फोटो:फाईल फोटो,@anandmahindra/Twitter)

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करून तो नियमितपणे त्याच्या फॉलोअर्सचं मनोरंजन करत असतात तर कधी माहितीपूर्ण पोस्ट टाकत असतात. ट्विटरवर आनंद महिंद्राचे ८.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांनी आज एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मानवतेचा दाखला देणारा सुंदर व्हिडीओ नेटीझन्सलाही प्रचंड आडवला आहे. हा व्हिडीओ बघून आणि खाली नेटीझन्सने केलेल्या कमेंट्सवरून राजस्थान साईडचा असेल असं वाटत आहे. मूळचा हा व्हिडिओ टिंकू वेंकटेश या ट्विटर युजरने पोस्ट केलेला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओला पोस्ट करताना “आणि कधीकधी तुम्हाला असे दृश्य दिसते जे तुम्हाला आशा देते की मानवता आणि ग्रह सुसंगत असतील. अतुल्य भारत.” असं कॅप्शन दिल आहे. यामध्ये एक भाजी विकणारी महिला मोराला द्राक्ष खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस भाजी विकणाऱ्या महिलेला विचारताना दिसत आहे की, “रोज हा मोर येतो का?” त्यावर ती महिला म्हणते, “हो रोज येतो हा मोर” तो भूक लागल्यावर कू कू असा आवाज करतो हे सुद्धा ती महिला या व्हिडीओमध्ये सांगते. अवघ्या ५५ सेकंदाचा हा व्हिडीओ खरच सुखावणारा आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आतापर्यंत १.१ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे. तसेच जवळ जवळ ३० हजार लोकांनी पसंतही केलं आहे. अडीच हजाराहून जास्त लोकांनी याला रीट्विट अर्थात पुन्हा पोस्ट केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर छान कमेंटही केल्या आहेत. एक युजर कमेंट करतो की, “राष्ट्रीय पक्षाला भारत माता भरवत आहे….. किती सुंदर दृश्य” हा सुंदर व्हिडीओवर कमेंट करत काही युजर्सने काळजीही व्यक्त केली आहे. एक युजर लिहतो की, “अतुल्य भारत आणि अतुल्य निसर्ग … पण ग्रहाचे रक्षण करा.” अनेकांनी स्वतःचाही मोरासोबतचा फोटो कमेंट केला आहे. तर काहींनी त्या महिलेचे कौतुकही केले आहे.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anand mahindra tweeted beautiful video with the caption incredible india ttg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या