सोशल मीडियामुळे अनेकांच्या आयुष्याचा काही क्षणात कायापालट झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. कोणी त्यांच्या उत्तम डान्समुळे तर कोणी गायलेल्या गाण्यामुळे त्यांना अनेक मोठ्या संधी सोशल मीडियामुळे उपलब्ध झाल्या आहेत. सोशल मीडियाच्या याच ताकदीचा पुन्हा एकदा प्रत्येय आला आहे. तो म्हणजे एका गरीब महिलेच्या घरात खाण्यासाठी अन्न नव्हते तिला एका फेसबुक पोस्टमुळे तब्बल ५० लाखाहून अधिकची रक्कम मिळाली आहे.
हेही वाचा- नॅनो कारपासून बनवलं हेलिकॉप्टर: पेट्रोलचे महाग दर विसरा; हवा पाण्यावर गाडी बनवणार हा पठ्ठ्या
केरळमधील एका गरीब महिलेला अनेक लोकांनी सोशल मीडियावर क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जवळपास ५० लाखांहून अधिक रुपयांची मदत केली आहे. खरंतर ही महिला तिची मुलं ज्या शाळेत शिकतात तेथील एका शिक्षिकेकडे ५०० रुपयांचे कर्ज मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी या शिक्षिकेला महिलेच्या गरीब परिस्थितीची जाणीव झाली आणि तिने महिलेच्या मदतीसाठी क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली. या घटनेची माहिती बीबीसीने दिली आहे.
बीबीसीच्या माहितीनुसार, केरळमधील ४६ वर्षीय सुभद्रा पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत होती. तिच्याकडे मुलांच्या जेवणासाठीदेखील पैसे नव्हते. त्यामुळे सुभद्राने मुलांना शिकवणाऱ्या एका महिला शिक्षिकेकडून ५०० रुपयांचे कर्ज मागितले. सुभद्राची परिस्थिती पाहून शिक्षिका भावूक झाल्या शिवाय एवढ्या पैशांनी तिची आणि मुलांच्या गरजा पुर्ण होणार नाहीत याची जाणीव शिक्षिकेला झाली. म्हणून शिक्षिकेने सुभद्राला आणखी काही पैशांची मदत मिळावी यासाठी सोशल मीडियावर क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली. त्या मोहीमेअंतर्गत सोमवारपर्यंत सुभद्राला ५४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे.
हेही वाचा- विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाऊन केलं लग्न; घरच्यांना दिली सुप्रिम कोर्टाची धमकी
सुभद्रा नोकरीही करु शकत नाही –
सुभद्रा पैसे कमावण्यासाठी नोकरीही करु शकत नाही. कारण, तिच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलाला ‘सेरेब्रल पाल्सी’ची नावाची समस्या आहे. त्यामुळे तिला आपल्या मुलाजवळ सतत थांबावं लागतं. त्यामुळे नोकरीनिमित्त घरातून बाहेर पडणं तिच्यासाठी अशक्य आहे. यामुळे हाताला काम नाही आणि घरात खायला अन्न नाही. अशा परिस्थित हतबल झालेल्या सुभद्राने शुक्रवारी स्थानिक शाळेतील शिक्षिका गिरिजा हरिकुमार यांच्याकडे मदत मागितली.
सुभद्राच्या गरीबीची जाणीव झाल्यामुळे गिरिजा यांनी तिला एक हजार रुपये दिले. शिवाय शिक्षिका सुभद्राच्या घरी गेल्या असत्या त्यांना भयंकर वास्तव दिसलं. गिरीजा यांनी सांगितलं की, मी सुभद्राच्या स्वयंपाकघरात केवळ मूठभर धान्य होते आणि मुलांकडे खायला काहीच नव्हते. त्यामुळे सुभद्राला थोडीशी रक्कम देण्यात काही अर्थ नव्हता म्हणून क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली.
अन् फेसबुक पोस्टमुळे पालटलं नशीब –
त्यानुसार, गिरीजा यांनी फेसबुकवर सुभद्राच्या कुटुंबीयांच्या गरीबीबाबतची एक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लोकांना सुभद्राला मदत करण्याचे आवाहन केले. या पोस्टमध्ये त्यांनी सुभद्राच्या बँक खात्याचा तपशीलही दिला होता. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि सुभद्राच्या खात्यात ५० लाखांहून अधिक रुपये जमा झाल्यामुळे सुभद्राचे नशीब पालटले आहे.