Viral Video: कुत्रा हा नेहमीच एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. घराचे रक्षण, गुन्ह्यांची तपासणी, चोरांना पकडणे आदींसाठी नेहमीच कुत्र्यांचा उपयोग करण्यात येतो. सोशल मीडियावर याबाबतचाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. एक मुलगी रस्त्यावरून एकटी चालत जात असते. तितक्यात तिथे एक अज्ञात गाडीचालक व्यक्ती येते आणि मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करते. पण, वेळीच रस्त्यावरील कुत्रा तिथे येतो आणि मुलीची त्या संकटातून सुटका करतो.

एक लहान मुलगी रस्त्यावरून चालताना दिसते आहे. हळुवार चालत ती पुढे येत असते. तितक्यात मागून एक चारचाकी गाडी येते आणि मुलीला एकटीच चालत येताना बघून गाडीचालक व्यक्ती तिथे गाडी थांबवून गाडीचा दरवाजा उघडते. आपल्याला बघून अज्ञात गाडीचालक व्यक्तीने अचानक गाडी थांबवली हे पाहून मुलगी घाबरते आणि भीतीने मागे होते. मुलगी मागे जातेय हे पाहून गाडीचालक व्यक्तीही आपली गाडी वेगात मागे घ्यायला सुरुवात करते आणि गाडी मुलीजवळ नेऊन पुन्हा थांबवते. ते पाहून मुलगी पुन्हा घाबरते. मग मुलीची या संकटातून कशी सुटका झाली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

हेही वाचा…गजब टॅलेंट! तरुणाने जिभेने काढलं विराट कोहलीचं चित्र, Video पाहून व्हाल अवाक्

व्हिडीओ नक्की बघा :

रस्त्यावरील कुत्र्याने केली मदत :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावरून एकट्या चालत जाणाऱ्या मुलीला पाहून अज्ञात गाडीचालक व्यक्ती मुलीला घाबरवण्याचा आणि दरवाजा उघडून तिला खेचून गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्नात असते. मुलगी घाबरून जेव्हा मागे जाते तेव्हा गाडीचालक व्यक्ती वेगात गाडी मागे नेऊन दरवाजा उघडते. तितक्यात मागून रस्त्यावरील एक कुत्रा वेगात धावत येतो आणि अज्ञात व्यक्तीवर भुंकण्यास सुरुवात करतो. हे पाहून अज्ञात गाडीचालक व्यक्ती गाडीचा दरवाजा बंद करते आणि निघून जाते. मग कुत्रादेखील त्या गाडीच्या मागे वेगात धावत जातो.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ परदेशातील आहे. घडलेल्या या सर्व प्रकारात स्वाभाविकपणे मुलगी खूपच घाबरून जाते. काही वेळ ती तिथेच उभी असते आणि मग रस्त्याच्या कडेकडेने धावत निघून जाते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pituresfolder या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी रस्त्यावरील त्या कुत्र्याचे कौतुक केले आहे.