हौस फार मोठी गोष्ट आहे. ही हौस जेव्हा एका सीमेपलीकडे गेली तर तो वेडेपणा ठरतो. या वेडेपणामध्ये व्यक्ती काहीही करू शकतो. असंच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या जॅस्मिन फॉरेस्टसोहत झाले आहेय फॉरेस्टला लहानपणीपासून बार्बी डॉल प्रंचड आवडतं असते आणि थोडी मोठी झाल्यानंतर तिने स्वत:च बार्बी डॉल होण्याची जिद्द पकडली. त्यासाठी तिने चेहरा, मानेसहीत शरीराच्या विविध अंगाची शस्त्रक्रिया केली आणि अखेर स्वत:ला बार्बी सारखी बनण्यात ती यशस्वी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय फॉरेस्टने स्वतःला बदलण्यासाठी १ लाख डॉलर म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपये खर्च केले. यासाठी अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी करावी लागली तर अनेक वेळा कॉस्मेटिक प्रक्रियांचा वापर करावा लागला. news.com.au च्या रिपोर्टनुसार, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी फॉरेस्टने पहिली प्लास्टिक सर्जरी केली होती. लॉस एंजेलिसला जाऊन तिने तिचे स्तन वाढविण्यासाठी शस्त्रक्रिया केली​आणि ती खऱ्या आयुष्यातील बार्बी झाली. गेल्या वर्षीही तिने दुसऱ्यांदा स्तन वाढवले​होते. केवळ स्तनाची प्लास्टिक सर्जरी झाली असे नाही, तर तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वनाने संपूर्ण शरीरावर कित्येकवेळा शस्त्रक्रिया केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian woman spends more than rs 82 lakh and underwent various surgeries to transform herself into real life barbie princess snk
First published on: 28-05-2023 at 16:42 IST