गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सर्वजण गणरायाच्या स्वागताची तयारी करत आहे. ढोल-ताशा लेझीम आणि जांझ पथकांचे जोरदार तालीम सुरु आहे. दरम्यान सध्या असाच एक लेझीम पथकाचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील उत्हासाने नाचू लागाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये, काही तरुण आणि काही वृद्ध लोक हातात लेझीम घेऊन, ताशा आणि झांजाच्या तालावर नृत्य सादर करत आहेत. नाचणाऱ्यांचा हा उत्साह पाहून तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू येईल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही वृद्ध लोक देखील तरुणांच्या बरोबरीने नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडीओ कोल्हापूरच्या विसावा मंडळासा असल्याचे समजते. व्हिडीओ जुना असून पुन्हा व्हायरल होत आहे.

हेही वाचा – जुगाड करून बोटीमध्ये बसवला पॅडलवर चालणारे वल्हव; व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर चला वारीला या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”गणेशोत्सव जवळ यावा आणि कोल्हापूरची लेझीम न आठवावी..!!!” त व्हिडीओ आता पर्यंत २४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तुम्ही एकदा काय वारंवार पाहिला तरी तुम्ही मन भरणार नाही असे नेटकऱ्यांचे मत आहे.

हेही वाचा – बाप लेकीचं प्रेम! फ्लाइटसाठी तयार होणाऱ्या एअरहोस्टेस लेकीला घास भरवतायेत वडील; तुफान व्हायरल होतोय ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एकाने लिहिले की, ” गेले १५ मिनिटे झाले सारखा हाच व्हिडीओ पाहतोय पण स्वाईप करण्याची इच्छाच होत नाही.” तर दुसऱ्याने लिहिले ”गणपती बाप्पा मोरया”.