सोशल मीडियावर रोज नवनव्या गोष्टी व्हायरल होत असतात. लोकांना या गोष्टी कधी अस्वस्थ करतात. कधी आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात. सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ एका भल्या मोठ्या अजगर आणि एका व्यक्तीशी संबंधित आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. त्याला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या खांद्यावर एक अत्यंत जड महाकाय अजगराला खांद्यावर घेऊन फिरताना दिसत आहे. अजगराची लांबी २० फुटांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये तो माणूस अजगराला खांद्यावर घेऊन एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिसत आहे. यानंतर तो एका खोलीत प्रवेश करतो. यावेळी अजगराने आपलं डोकं वर काढलेलं दिसून येत आहे. हा सीन एखाद्या हॉरर चित्रपटासारखा वाटतो. ज्या पद्धतीने २० फुटांपेक्षा मोठा अजगर खांद्यावर घेऊन जात आहे, ते खरोखरंच थक्क करणारं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढतील. विशेषत: ते लोक घाबरतील, जे सापाचे नाव ऐकताच थरथर कापायला लागतात.

A wild animal stole the elephant's ear Seeing the Video
बापरे! जंगली प्राण्याने पळवला चक्क हत्तीचा कान; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
Tried to bite the person who came to catch the python
बापरे, अजगराची सटकली! पकडायला आलेल्या सर्पमित्राला डसण्याचा प्रयत्न; पुढे जे घडलं ते खूप भयानक, पाहा VIDEO
a man Soaking chapati with tap water and eating it
Viral Video : वडिलांचा संघर्ष कुणाला दिसत नाही! नळ्याच्या पाण्याने पोळी भिजवून खातोय, व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
what is hallucinations
तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
an old man doing pushups
VIDEO : नाद पाहिजे! डोक्यावर टोपी, पांढरा शुभ्र सदरा अन् पायजमा; आजोबांनी मारले पुशअप्स, पाहा व्हिडीओ
csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा : ‘या’ अमेरिकेन पठ्ठ्यानं ‘रिंकिया के पापा’ भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIRAL VIDEO

काही सेकंदांचा हा व्हिडीओ असून हा व्यक्ती सुमारे वीस फूट लांबीच्या एका महाकाय अजगराला खांद्यावर उचलून स्नेक हाऊसमध्ये जात असल्याचं दिसून येत आहे. मग यापुढे जे फ्रेममध्ये दिसतं ते देखील खूप आश्चर्यकारक आहे. या भल्या मोठ्या अजगराला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसून येते नाही. जणू तो अजगर त्याचा मित्र असल्यासारखं तो त्याला खांद्यावर घेऊन फिरवत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती अजगराला खांद्यावर ठेवून ऐवढी आनंदी दिसत आहे की जणू एखाद्या लहान मुलाला तो खांद्यावर बसवून खेळत असल्यासारखं वाटत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईने दुकानदाराला दिले पैसे, एका दिवसात ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

ती व्यक्ती अजगराला खांद्यावर घेऊन चालत असतानाच एक आश्चर्यकारक दृश्य समोर येते. खरं तर जेव्हा तो अजगराला खांद्यावर घेऊन जातो, तेव्हाच अजगराने त्याचे तोंड हवेत उचलले. जणू अजगर त्याला जिवंत गिळतो की काय असा प्रश्न मनात येऊ लागतो. या अजगराने माणसाला कोणतीही इजा केली नाही. याउलट तो व्यक्तीच्या खांद्यावरील सवारीचा आनंद घेताना दिसून आला.

आणखी वाचा : घोडा रडतानाचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : DiCaprio Tree: हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओच्या नावाचं झाड! आफ्रिकामधली एक अद्भुत वनस्पती

हा व्हिडीओ hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर आठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाऊ, त्याला खाली ठेवा. तो किती मोठा आणि धोकादायक दिसत आहे ते आम्ही पाहात आहोत.’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांनी इमोटिकॉनद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.