Viral Video : असं म्हणतात, तरुणपणीचं प्रेम हे जगावेगळं असतं. अनेकदा तरुण मुले मुली जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडतात, तेव्हा त्या प्रेमात एकमेकांकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नसली तरी जिद्द असते. अनेकदा प्रेमात पडलेल्या या तरुणांना आपण नेमकं काय करतोय, याची तितकी समजही नसते. सोशल मीडियावर पहिल्या प्रेमाबाबत तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. कधी प्रेमामुळे आईवडिलांकडून मार तर कधी आईवडिलांपासून लपविलेले प्रेम असे अनेक प्रेमाचे भन्नाट किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या आईच्या हातचा नाही तर बॉयफ्रेंडच्या आईच्या हातचा मार खाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. भर रस्त्यावर घडलेल्या या मजेशीर घटनेचा व्हिडीओ पाहून कोणालाही हसू येईल. (a Girl Called her Boyfriend to meet him but Got Caught by his Mother instead)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यात एक तरुणी स्कुटीवर बसलेली आहे आणि एक काकू तिला मारताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्हाला कळणार नाही, नेमकं काय घडतेय. जेव्हा काकूला एक दुचाकी चालक विचारतो, काकू का त्या तरुणीला त्रास देत आहे. त्यावर काकू सांगते, “माझे आयुष्य खराब केले या तरुणीने. माझ्या मुलाला भेटायला बोलावले” त्यावर ती तरुणी म्हणते, “मी नाही बोलावले काकू” त्यानंतर दोघींमध्ये वाद होतो आणि एकमेकींना मारहाण करताना दिसतात. शेवटी काकू तरुणीच्या स्कुटीची चावी घेऊन जातात. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. भर रस्त्यावर घडलेला प्रकार पाहून काही लोकांना हसू आवरता येणार नाही.

Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Canada Toronto Uber driver told female passenger if she was in Pakistan he would kidnap her
VIDEO : “जर तु पाकिस्तानात असती तर किडनॅप केले असते..” पाकिस्तानी ड्रायव्हर महिलेला थेट बोलून गेला; व्हिडीओ होतोय व्हायरल
iphone container found in sea drowned in the Ocean video
समुद्रात आयफोनचा कंटेनर पलटी; लोकं अक्षरश: तुटून पडले, संतापजनक VIDEO होतोय व्हायरल
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man was trying to bullying a child instead of this child beaten him video
“वय नाही हिम्मत लागते” भर बाजारात कॉलर पकडणाऱ्याला एकटा भिडला चिमुकला, VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

@gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका तरुणीचा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या आईबरोबर वाद (मुलीने बॉयफ्रेंडला भेटायला बोलावले पण बॉयफ्रेंडच्या आईने पकडले) या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सासू सुनेमध्ये वाद” तर एका युजरने लिहिलेय, “भारतात ही खूप सामान्य गोष्ट आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पापा की परी ला पकडले” एक युजर लिहितो, “काकू ब्रेकअप करणार वाटते” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर भरत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.