एकविसाव्या शतकात वैद्यकशास्त्र आणि विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही असे अनेक लोक आहेत जे वैद्यकीय उपचारापेक्षा भूतबाधाला अधिक महत्त्व देतात. काळी जादू, गुप्तधन यासारख्या प्रकारातून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. असाच काहीसा अघोरी प्रकार वाराणसीतून समोर आला आहे. गोवर्धन पूजेत एका चिमुकल्याला उकळत्या दुधाने अंघोळीचा हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलाच्या आरोग्याशी व आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार निंदनीय आहे.

उत्तरप्रदेशमध्ये नुकतीच एक घटना समोर आली आहे. ही घटना बलिया जिल्ह्यातील श्रवणपूर येथील आहे. येथे श्रद्धेच्या नावाखाली आयोजित गोवर्धन पूजेत एका चिमुकल्याला उकळत्या दुधाने अंधोळ घातल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

बाळ वेदनेनं व्हिवळत होतं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती एका बाळाच्या उघड्या अंगावर मातीच्या भांड्यातील उकळत्या दुधाचा फेस काढून लावत आहे. यावेळी बाळ वेदनेनं व्हिवळत होतं, मात्र तरीही उपस्थित असलेल्यापैंकी कुणालाही बाळाची दया आली नाही. सगळे हा प्रकार फक्त बघत होते. लोकांचे म्हणणे आहे की, ही यादव समाजाची गोवर्धन पूजेची विधी आहे. ही खास पूजा पंडित अनिल यादव पार पाडतात. यामुळे घरात सुख-शांती येते व कुटूंबावरील संकट टळते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – जंगलात विषारी सापाला पकडण्यासाठी गेले अन्…थरारक रेस्क्यूचा Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर संताप व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी या पंडितावर कारवाई करण्याची आणि इथून पुढे हे प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.