लग्नासाठी अनेक खटपटी करणारे तरुण आपण पाहिलेच असतील. वधू-वर सूचक मंडळापासून अगदी टिंडरसारख्या डेटिंग ऍप्सपर्यंत सगळे पर्याय करून बघणारेही तरुण आहेत. मात्र हा तरुण काहीतरी वेगळा आहे. याने बायको शोधण्यासाठी चक्क २० फुटांचे होर्डिंग्ज उभारले आहेत आणि त्यासाठी हजारो-लाखो रुपये खर्च केले आहेत. मला अरेंज मॅरेजपासून वाचवा, असा मजकूर या होर्डिंग्जवर लिहिलेला आहे. नक्की काय आहे हा प्रकार?

ब्रिटनमधल्या मोहम्मद मलिक या २९ वर्षीय तरुणाने बर्मिंगहमच्या रस्त्यांवर साधारण २० फुटांचे तीन-चार होर्डिंग्स उभारले आहेत. या होर्डिंगवरती “मला अरेंज मॅरेजपासून वाचवा”, असं लिहिलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवर FindMalikAWife.com ही वेबसाईटही दिली आहे. या वेबसाईटवर गेलं असता त्यावर लिहिलेलं आहे की, हाय, मी मलिक. तुम्ही माझा चेहरा कुठेतरी होर्डिंगवर पाहिलेला असेल. मी २९ वर्षांचा आहे, लंडनमधल्या ला विदा मध्ये राहतो. मी एक व्यावसायिक आहे, फूडी आहे आणि धार्मिक आहे. मी अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात आहे ती सध्या दीन संदर्भात काम करत आहे. धर्मासाठीचे काही अरबी शब्दही त्याने वापरले आहेत.

हेही वाचा – Viral News: पाद विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय

मलिक याने आपल्या अपेक्षांमध्ये लिहिलेलं आहे की, कोणत्याही धर्माची मुलगी आपल्याला बायको म्हणून चालेल. पण तिने आपल्या नातेवाईकांशी जुळवून घेतलं पाहिजे, मोकळेपणाने बोललं पाहिजे अशी मलिकची अपेक्षा आहे. आपण पंजाबी परिवारातले असल्याचंही त्यानं नमूद केलं आहे. त्याचबरोबर तो एकुलता एक आहे आणि त्याच्या परिवारात आई- वडील असल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्याने इच्छुकांसाठी फॉर्मही दिलेला आहे.

या फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, वय, व्यवसाय अशी प्राथमिक माहिती आहे. आपण स्वतःसाठी स्वतःच बायको, जोडीदार शोधत असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. जोडीदार शोधण्यासाठी होर्डिंग्स उभारण्याची ही काही पहिली वेळ नाही. आपल्या मुलीसाठी नवरा शोधण्यासाठी एका आईनेही हा पर्याय निवडला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.