सोशल मीडियाच्या दुनियेत कधी आणि काय पाहायला मिळेल हे कुणीच सांगू शकत नाही. सध्या सर्वांना थक्क करणारा एक व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ एका माकडाचा आहे. तुम्ही आतापर्यंत माकडाला इथून तिथे उड्या मारताना पाहिलं असेल, काही धीड माकडांनी लोकांच्या हातातील वस्तू पळवून नेलेलं पाहिलं असेल. अनेकदा तर माकडांच्या मस्तीचे व्हिडीओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण दाढी करणारा स्टायलिश माकड तुम्ही पाहिलाय का ? होय, हे खरंय. अगदी माणसांप्रमाणेच हे माकड दाढी करण्यासाठी सलूनमध्ये पोहोचलाय. अगदी ऐटीत खुर्चीवर बसून हे माकड न्हाव्याकडून दाढी करवून घेतोय. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ४५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माकड ट्रिमिंगसाठी खुर्चीवर बसले आहे आणि न्हावी कंगव्याने त्याचे केस व्यवस्थित करत असल्याचे दिसून येते. न्हावी ज्यावेळी त्याच्या ट्रिमिंगसाठी हेअर कटिंग मशीन उचलतो त्यावेळी माकड थोडं घाबरतं. न्हावी हळू हळू माकडाची दाढी करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. मात्र, यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल. एखादी व्यक्ती खुर्चीवर बसल्यासारखी प्रतिक्रिया हे माकड देतं. सलूनमध्ये चक्क माकड दाढी करण्यासाठी आल्याचं पाहून तिथले सारेच जण हैराण झाले. सलूनमध्ये येणारे जाणारे लोक या स्टायलिश माकडाचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसून येत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘आता दिसतोय स्मार्ट…ब्यूटी पार्लर’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दाढी करताना माकडाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हे पाहण्यासाऱखे आहेत. ज्यावेळी हे माकडे आपले डोळे मिचमिच करू लागतो ते पाहून सारेच जण या स्टायलिश माकडाच्या प्रेमात पडले आहेत. दाढी करून झाल्यानंतर हे माकड अतिशय सुंदर दिसतं.

आणखी वाचा : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या पाणीपुरीवाल्याचा VIRAL VIDEO घालतोय धुमाकूळ; ऐकून चकीत व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : PHOTOS : एका VIRAL VIDEO मुळे मालामाल झाला हा ‘Paragliding Man’; आज लाखोंमध्ये कमवतोय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमधील प्रतिक्रिया वाचून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल.