Beauty Salon Funny Video : मेकअप, स्किन- हेअर केअर या महिलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. महिलांना विविध कार्यक्रम, सण-समारंभ किंवा पार्टीनिमित्त सजायला आवडतं. त्यामुळे घरात अगदी छोटासा का कार्यक्रम असेना, त्या तासन् तास ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसतात. काही फेशियल, वॅक्स, आयब्रो, हेअरकट करायला तर, काही मेकअप करण्यासाठी इथे जातात. त्यामुळे दिवसेंदिवस ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे परिसरातही हल्ली अनेक ठिकाणी लहान-मोठे ब्युटी पार्लर, ब्युटी सलोन पाहायला मिळतात. या ब्युटी सलोनची नावेही अनेकदा तितकीच हटके असतात. अशाच एका ब्युटी सलोनच्या नावाची पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय, जी वाचून तुम्हाला पोट धरून हसायला येईल.
पार्लरवालीने तिच्या ब्युटी सलोनला असे काही नाव दिले आहे की, वाचल्यानंतर तुम्हाला आधी हसू येईल; पण तुम्ही तिच्या धाडसाचेही तितकेच कौतुक कराल.
प्रत्येक जण आपल्या दुकानाचे नाव काहीतरी हटके ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा तुम्हालाही दुकानांवरील हटके नावांच्या पाट्या दिसत असतील, ज्या वाचून तुम्हीही विचार करत असाल की, हे नाव दुकानदाराला नेमकं सुचलं तरी कसं असेल बुवा… अनेकदा काही नावं अशी असतात की, जी वाचताच हसू येते. अशाच प्रकारे एका ब्युटी पार्लरवालीने तिच्या ब्युटी सलोनचे नाव असे काही ठेवलेय की, महिलांना प्रश्न पडेल इथे जायचं की नाही… कारण नावावरून तरी तिथे जाणं म्हणजे कोणालाही स्वत:चा अपमान करून घेण्यासारखंच वाटेल. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हालाही हसू आवरणार नाही.
त्यामुळे या ब्युटी सलोनचे नाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, ब्युटी सलोनचे नाव चक्क बंदरिया, असे आहे, जे वाचतानाच खूप विचित्र वाटतेय. या बंदरिया ब्युटी सलोनच्या बोर्डवर वर-वधूचा सजलेला कार्टून टाईप फोटोही आहे. या सलोनमध्ये वधूच्या मेकअपसह पार्टी आणि इतर कार्यक्रमांसाठी मेकअप, हेअर स्टाईल, नेलआर्टदेखील केले जाते. सोशल मीडियावर आता या सलोनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. अनेक जण त्यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करतायत.
ब्युटी सलोनचा हा मजेशीर व्हिडीओ @kanpuriyabhaiya नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता लाइक्स आणि कमेंट्सचा पूर आला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘बंदरिया ते वधूपर्यंतचा प्रवास’. दुसऱ्याने लिहिले की, ‘हा बोर्ड या मुलीच्या भावाने बनवला असावा’. तिसऱ्याने लिहिले की, प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला डेंटिंग, पेंटिंग व पॉलिशिंगसाठी येथे पाठवेल’. अनेक युजर्स त्यांच्या मैत्रिणींना गमतीत या सलोनला भेट देण्यास सांगत आहेत.