Premium

नवऱ्याचा नादच खुळा! बीडमध्ये बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

गौतमी पाटील या कार्यक्रमाला बीडमध्ये आली होती आणि त्या ठिकाणी एकच गर्दी झाली होती

Beed man organised gautami patil-dance show for wife birthday
बीडमध्ये पत्नीच्या वाढदिवसाला पतीने आयोजित केला गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम (फोटो सौजन्य-गौतमी पाटील- इंस्टाग्राम पेज)

सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचं कारण लावणी आणि रिलस्टार गौतमी पाटीलच आहे. गौतमी पाटीलने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या लावणीच्या जाहीर कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यानंतर होणारी धक्काबुक्की, हाणामारी या सगळ्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. मात्र आता गौतमी पाटील चर्चेत आहे ती बीडमधल्या तिच्या कार्यक्रमामुळे. बीडमधल्या एका हौशी नवऱ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात ती आली ती नाचली आणि तिने उपस्थितांची मनं जिंकली. मात्र बीडमधल्या या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच होताना दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं बीडमध्ये गौतमी पाटील आल्यावर?

बीडमधल्या आष्टीमधल्या किरण गावडे यांनी त्यांची बायको प्रगती गावडे यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला. गौतमी पाटील या कार्यक्रमाला आल्यानंतर सगळेच उपस्थित बेभान झाले होते. निमगाव बोडखा या ठिकाणी हा कार्यक्रम होता. तिथे जमलेल्या सगळ्या उपस्थितांनी गौतमीच्या तालावर ठेका धरला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Beed man organized gautami patil dance show for wife birthday scj

First published on: 22-03-2023 at 09:10 IST
Next Story
मुलीने प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल; नवदाम्पत्याला जबरदस्तीने गाडीत घातल अन्…