Family Thrashes Couple Over Parking Issue: सोशल मीडियावर रोज नव नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच शेजाऱ्यांसोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध असावेत असे म्हटले जाते. कारण एखादी आपत्कालीन स्थिती ओढावल्यास आपण सर्वात प्रथम त्यांना बोलावू शकतो. अशातच गरजेचे आहे की, त्यांच्यासोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध जपले पाहिजेत. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, असे शेजारी नकोच रे देवा. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत.

पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये वाद

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video

शेजाऱ्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वीही पाहिले आहेतच. छोट्या छोट्या कारणांवरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होत असतात, आणि कधी कधी याच वादाचं रुपांतर हाणामारीतही होतं. असाच एका प्रकार बेंगळुरूमधून समोर आली आहे. अलीकडेच बेळगावहून शहरात आलेल्या एका जोडप्याला पार्किंगच्या समस्येवरून काही व्यक्तींनी बेदम मारहाण केली. जोडप्यांनी त्यांचे वाहन मारहाण करत असलेल्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या रिकाम्या जागेत पार्किंग केले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलिसांनी याची नोंद घेतली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी दोड्डणेकुंडी परिसरातील रहिवासी वस्तीत असलेल्या रस्त्यावर एका जोडप्याला काही लोक बेदम मारहाण करण्यात आली. दोन व्यक्ती महिलेला धक्काबुक्की करत असताना तिचा नवरा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये हे दोघे त्या व्यक्तीला निर्दयीपणे मारताना आणि जमिनीवर ढकलताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरे एवढ्या चिकण्या पोरी…” उदयनराजेंनी सेल्फी घेणाऱ्या छोट्या फॅनसमोर केली डायलॉगबाजी; VIDEO पाहून व्हाल लोटपोट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्स अकाऊंटवरून शेअर केला आणि बेंगळुरू पोलिसांना टॅग केले. पोलिसांनी हे प्रकरण एचएएल पोलिस स्टेशनला पाठवले आणि सर्व आरोपींना अटक केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४, ३२४ आणि ५०६ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.