नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे ही सक्ती करण्यात आली. पण तरीही अनेकजण विना हेल्मेट बाईक, स्कूटर चालवताना दिसतात. हेल्मेट सक्तीचा नियम हा आपल्याच सुरक्षेसाठी करण्यात आला आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही. हेल्मेट घातले नाही तर दंड भरावा लागेल या भीतीने अनेकजण फक्त लांबून पोलीस उभे असलेले दिसले की लगेच हेल्मेट घालतात. पण कधी पोलिसांनीच दंड भरावा लागला असल्याचे तुम्ही ऐकले आहे का? नुकतीच अशी एक घटना बंगळूरमध्ये घडली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

बंगळूरमधील आर.टी नगर येथे एका पोलिसाने पोलिसालाच दंड आकारल्याची घटना घडली आहे. दंड आकरण्यात आलेल्या पोलिसाने स्कूटर चालवताना अर्धवट हेल्मेट घातल्याने त्यांना पोलिसांनी अडवले आणि त्यांच्या या चुकीवर दंड आकरण्यात आला. आर.टी नगर ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून हा दंड आकरण्यात आल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, पाहा व्हायरल होणारा हा फोटो.

Viral : पोलिसांकडेच पुरावा मागणे त्याला पडले महागात; बंगळूरमधील या घटनेने वेधले साऱ्यांचे लक्ष

आर.टी नगर ट्रॅफिक पोलिसांचे ट्वीट :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो पाहून हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी समान असून, अगदी पोलिसांना देखील दंड आकारला जाऊ शकतो हे स्पष्ट होते. सर्वसामान्यांनी नियमानुसार वागावे अन्यथा त्यांनाही असा दंड होऊ शकतो, नियम सर्वांसाठी सारखेच असतात हे दाखवणारे हे उत्तम उदाहरण आहे.