Bhaubeej Marathi Wishes To Free Download: कार्तिक शुद्ध द्वितीयेचा उदय तिथीनुसार भाऊबीजेचा सण हा यंदा १५ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. यमुनेने यमाचे औक्षण केल्यावर त्याने तिला काय हवे असे विचारले असता तिने दरवर्षी तू माझ्या घरी एकदा यायचंस आणि या दिवशी जी बहीण तिच्या भावाला ओवाळेल तिच्या भावाचं रक्षण करायचंस असं वरदान मागितलं. या दिवसापासून मग भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची परंपरा सुरु झाली. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी केवळ दोन तास असणार आहे. पण मुहूर्त दोन तासाचा असला तरी आनंद आपण दिवसभर साजरा करू शकता. आता आनंद साजरा करायचा म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देणं आलंच. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी अगदी तुमच्या नात्याला शब्दांचं रूप देणाऱ्या काही शुभेच्छा ग्रीटिंग्स स्वरूपात घेऊन आलो आहोत.

भाऊबीजेच्या निमित्त आपणही आपल्या Whatsapp Status, Instagram Post, Stories, Facebook किंवा थेट मेसेज करून या शुभेच्छा शेअर करू शकता. खास म्हणजे ही सर्व भन्नाट शुभेच्छापत्र आपण फ्री डाउनलोड करू शकता. त्यामुळे अजिबात वाट न पाहता तुम्हाला आवडेल ती HD Image, Greeting आजच सेव्ह करून ठेवा.

भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा (Bhai Dooj Marathi Wishes)

तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे..
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा

चिडून, भांडून, रागावून सुद्धा
ज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही
असं नातं म्हणजे भावा- बहिणीचं
तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

पाण्याच्या ग्लासावरून भांडणाऱ्या
पिझ्झाच्या शेवटच्या घासावरून चिडवणारा
आणि तरीही पैसे साठवून
राखी, दिवाळीला एकमेकांना गिफ्ट आणणाऱ्या
प्रत्येक गोड भावंडाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखीन एक सुंदर भेट द्यायची असेल तर उद्या तुम्ही व तुमच्या भावंडांचा फोटो थेट लोकसत्ता.कॉम वर झळकावू शकता. यासाठी आपल्याला लोकसत्ताच्या लोकउत्सव पेजला भेट द्यायची आहे. इथे तुम्हाला अगदी ३० सेकंदात तुमचा दिवाळीचा फोटो शेअर करता येईल. तुम्हाला सर्वांना लोकसत्ता कुटुंबाकडूनही भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!