सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील भोपाळमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी या मुस्लिम व्यक्तीने स्वत:च्या जीवाची फिकीर न करता ट्रेनसमोर उडी मारली. त्या व्यक्तीने सरळ धावत्या मालगाडी समोर उडी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचे नाव मोहम्मद महबूब असे आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भोपालमधील बारखेडी येथे घडली. पीटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी हातात सामान घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. त्याचवेळी मालगाडी आली, मालगाडी येत असल्याचे पाहून ती खूप घाबरली आणि त्याच रुळावर घसरून पडली.

सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला मोहम्मद महबूब हा सुतार काम करतो. हे त्याच वेळी नमाज अदा करून परतत होते. जेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदत मिळवण्यासाठी हाक मारायला सुरुवात केली, तेव्हा मोहम्मदने काही विचार न करता ट्रॅकवर उडी मारली. त्यानंतर तो त्या मुलीच्या दिशेने धावत गेला आणि त्याने त्या मुलीला तो पर्यंत डोकं वर करू दिलं नाही जो पर्यंत ट्रेन त्यांच्यावरून जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोणी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर मोहम्मदचे सोशल मीडियावर कौतूक करण्यात आले. एवढंच काय तर काही नेटकऱ्यांनी त्याचा पत्ता शोधून काढत त्याची भेट घेतली.