मराठी भाषेच्या मुद्दावर सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करण्याचा किंवा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णायाला महाराष्ट्रात कडाडून विरोध दर्शवला. “हिंदीची सक्ती सहन करणार नाही” असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर ५ जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. दरम्यान मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांना राज ठाकरेंच्या मनसेचे कार्यकर्ते मारहाण करत असल्याच्या घटनाही समोर आल्या. सोशल मीडियावर हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये होणारे वाद सतत चर्चेत येत आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेतच बोला असा आग्रह करताना दिसत आहेत तर महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणार नाही असे म्हण अनेक हिंदी भाषिकांचे व्हिडिओ चर्चेत येत आहे. अशा परिस्थितीमध्ये एका बिहारी तरुणाने सर्व महाराष्ट्रीयांचे आणि मराठी भाषिकांचे मन जिंकले आहे. “महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही तर कुठे बोलणार, पाकिस्तानमध्ये?” असे स्पष्ट मत व्यक्त करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
“व्हिडिओमध्ये तरुणाने नेमकं काय म्हटलं?” (What Exactly Did He Say in the Video?)
vibes_of_people नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण स्वत: सांगतो की तो बिहारी आहे तरीही तो मराठी भाषेचा आदर करतो. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याची मुलाखत घेत आहे जिथे तो महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केले. व्हिडीओमध्ये तो तरुण सांगतो की, महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. जन्मभूमी बिहार, जिल्हा – भोजपूर आहे. मी सत्याच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात कमावत आहे, खात आहे, राहात आहे तर मग मराठी बोलायला हरकत काय आहे? चार लोकांचा सन्मान करायाला हरकत काय आहे? चार लोकांचा मान ठेवून मला चार गोष्टी मिळत असतील त मी त्याच गोष्टींकडे लक्ष देईल. मराठी माणूस तुमच्याकडे येत असेल आणि मराठी बोलण्याचा आग्रह करत असेल तर एवढंच बोलायचं आहे की, हा दादा, जय शिवराय. मग बघा मराठी माणूस तुमच्याबरोबर किती चांगलं वागेन. उत्तर भारतीय नंतर आधी मी भारतीय आहे आणि भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय अपूर्ण आहे मग त्यांच्या बाजूने का उभे राहू नये. मला कधी मराठीमुळे कोणताही धोका वाटला नाही. मुद्दाम खोटी माहिती पसरवली जाते की, मराठी लोक यूपी, बिहारी लोकांना मारतात, त्यांच्या धर्माच्या वाटेला गेला तर ते कोणाचेच नाही. मराठी त्यांची आई आहे, आईला त्रास दिला तर ते बरोबर अद्दल घडवतात. त्यांना सांगा की, मी मराठी शिक आहे. मराठीचा सन्मान करत आहे. विरोध नाही करत, विरोध करू नका, विरोध केला तर मनसेचे लोक तुम्हाला विरोध करती. मराठीला विरोध केला तर मीरा रोडवर राहणे देखील अवघड होईल. मी देखील मीरा रोडवर राहतो, मी देखील हिंदी बोलतो. मी बिहारचा मुलगा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. मराठी भाषा त्यांची आहे.”
जेव्हा मुलाखत घेणारा व्यक्ती त्या बिहारी तरुणाला विचारतो की, तुम्हाला की वाईट अनुभव आला का त्यावर तो उत्तर देतो की, तुमच्यासमोर उभे राहून एक बिहारी मुलगा बोलत आहे हे मुंबईचे मोठ मनं आहे. हे मराठी माणसांच्या मनाचा मोठेपणा आहे.”
“नेटिझन्सच्या प्रतिक्रिया” (Reactions from Netizens)
तरुणाचे मराठी भाषेवरील प्रेम पाहून सर्वजण थक्क झाले आहे. तरुणाने मराठी भाषिकांचे मन जिंकले आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी त्याचे कौतुक केले. एकाने मजेशीर कमेट केली की. “जय शिवराय. तुझा आवजा ऐकून नाना पाटेकर आठवले.”
दुसरा म्हणाला की, “काश, सर्वजण तुझ्यासारखा समजूतदार असते. सलाम भाऊ!”
तिसरा म्हणाला की,” सन्मान हेच पाहिजे मराठी आणि महाराष्ट्राला.”
चौथ्याने कमेंट केली की, “मन जिंकलास दादा. जय जिजाऊ जय शिवराय”