Bill Gates Ka Viral Photo: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो साधारण ३० वर्ष जुना आहे. १९९४ मध्ये काढलेल्या फोटोमध्ये तरुण वयातील बिल गेट्स दिसत आहे ज्यांच्या एका हातात सीडी-रॉम आहे. ते एका भल्या मोठ्या कागदाच्या गठ्ठ्यावर बसलेले आहेत. गेट्स यांनी आपला जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ३० वर्ष जुन्या फोटोमागील रंजक किस्सा त्यांनी सांगितला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडिया यूजर्समध्ये खूप लोकप्रिय होत आहे. चला तर मग बिल गेट्स यांच्या या फोटोमागील रहस्य जाणून घेऊ या जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० वर्षे जुना फोटो शेअर करत बिल गे्ट यांनी दिला आठवणींना उजाळा
स्वत: बिल गेट्स यांनी हा फोटो त्याच्या अधिकृत अकांऊटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तरुण वयातील बिल गेट्स दिसत आहेत. त्यांच्या एका हातामध्ये सीडी-रॉम ( स्टोरेज डिव्हाइस – कॉम्पॅक्ट डिस्क-रीड ओन्ली मेमरी) आहे. तसेच ते कागदांच्या भल्या मोठ्या गठ्ठ्यावर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी दुसरा गठ्ठा ठेवण्यात आला आहे. यादरम्यान तो सीडी-रॉम धरून कॅमेऱ्याकडे हसताना दिसत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

येथे पहा फोटो

हेही वाचा – नव्या घराच्या भिंतीमध्ये अडकली मांजर; महिलेने वाचवला तिचा जीव: पाहा व्हायरल व्हिडिओ

सीडीची फेरी झाली

हा फोटो शेअर करताना बिल गेट्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ३० वर्षांपूर्वी आम्हाला हे दाखवायचे होते की, सीडी-रॉममध्ये किती माहिती गोळा केली जाऊ शकते. सीडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी अशा पद्धतीने फोटो काढणे आवश्यक असल्याचे टीमने ठरवले होते. ३ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला २ लाख ५४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. पोस्ट पाहिलेल्या काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच वेळी, काही लोकांना ते दिवस आठवत आहेत जेव्हा CD-ROM हा नवीन शोध होता आणि लोकांना तो काहीही झाले तरी तो विकत घ्यायचा होता. एकूणच या पोस्टला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

३० वर्षांपूर्वी लाँच झाली होती सीडी

पोस्ट पाहणाऱ्या युजरने लिहिले, “व्वा…काळ पंख लावल्याप्रमाणे उडून जातो. असे वाटते की सीडीचा शोध लागला ही काल घडलेली गोष्ट आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “शक्ती ज्ञानात नसते, तर त्या ज्ञानाची वापर करण्यात असते.”

हेही वाचा – “याला म्हणतात भक्ती!”, शनिदेवाच्या मंदिरात मूर्तीला प्रदक्षिणा घालत्येय ही मांजर; Viral Video पाहून लोकांना विश्वास बसेना

तुम्हाला माहित्येत का की, ही सीडी १९९४ मध्ये पहिल्यांदा सामान्य लोकांसाठी रिलीज झाली होती आणि लगेचच विकली गेली होती. या सीडींमध्ये गेम, चित्रपट आणि दस्तऐवजा यासंबधीत डेटा मोठ्या प्रमाणात गोळा केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill gates shares nostalgic tech journey of cd rom with throwback pic snk
First published on: 17-03-2024 at 14:26 IST