मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि सून राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम (फंक्शन) १ ते ३ मार्च या दरम्यान होता. कलाकार, क्रिकेटपटू; तर देश विदेशातील पाहुणे यांच्याबरोबर या कार्यक्रमात बिल गेट्स यांनीसुद्धा हजेरी लावली होती. यादरम्यान बिल गेट्स त्यांनी केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटीलासुद्धा भेट दिली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ५९७ फूट उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. गुजरातमधील केवडियाजवळील नर्मदा नदीच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात भव्य पुतळा आहे. या स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले होते, तर बिल गेट्स यांनी २ मार्च रोजी गुजरातमधील केवडियाजवळील जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. हा उंच पुतळा पाहून बिल गेट्स प्रभावित झाले. पाहा बिल गेट्स यांनी शेअर केलेला व्हिडीओ.

Indian author Soundarya Balasubramani assaulted in London
Soundarya Balasubramani : भारतीय लेखिकेला लंडनमध्ये मारहाण, पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sunil Gavaskar Statement on Mumbai Potholes and Praised Lucknow to Ayodhya Road in IND vs BAN
IND vs BAN: मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, रस्ते बांधणाऱ्यांचं उखळ पांढरं, गावस्करांनी कॉमेंट्री करताना लगावला टोला
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Ashka goradia
Aashka Goradia : टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीने उभारला ८०० कोटींचा व्यवसाय, ट्रोल झाल्यामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री!
Mohana Singh
Who is Mohana Singh : घरातूनच लढण्याचं बाळकडू अन् आकाशी झेप घेण्याचं स्वप्न; मोहना सिंग यांची यशस्वी भरारी!
Ilhan Umar meet rahul gandhi
Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमरची राहुल गांधींनी घेतली भेट, भाजपा आक्रमक!
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

हेही वाचा…World Wildlife Day 2024: चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवात रेखाटले वाघाचे ५० फुटांचे चित्र; पाहा सुदर्शन पटनायक यांचे खास वाळूशिल्प

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, या भव्य पुतळ्यासमोर उभं राहून बिल गेट्स नेटकऱ्यांना ते कुठे उभे आहेत, याचा अंदाज लावायला सांगत आहेत. त्यानंतर कॅमेरा हळूहळू या भव्य पुतळ्याची झलक दाखवण्यास सुरुवात करतो. नंतर पुढे एक महिला स्टॅच्यू ऑफ युनिटी संग्रहालयाभोवती बिल गेट्स यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. याशिवाय स्टॅच्यू ऑफ युनिटी कॉम्प्लेक्समध्ये बांधलेल्या आरोग्य व्हॅनसह इतर ठिकाणांनाही बिल गेट्स यांनी भेट दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ बिल गेट्स यांच्या अधिकृत @thisisbillgates या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “व्वा! जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी भेट दिली. या अभियांत्रिकी चमत्काराला भेट देण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांचे आभार मानतो आणि मला होस्ट (Host) केल्याबद्दल मुख्यमंत्री @bhupendrapbjp तुमच्या सरकारचे आभार मानतो”, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.