Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण एका पक्षाच्या अनोख्या शिकारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. कारण एका पक्षानं चक्क दोन पिल्लानं गिळलं आणि पुन्हा बाहेर काढलं आहे. विश्वास बसत नाही ना मग हा व्हिडीओ पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या पक्षानं दोन पिल्लांन अक्षरश: गिळलं आहे. तर तिसऱ्या पिल्लाला चोचीत पकडलेलं दिसत आहे. हे दृश्य पाहून सारेच अवाक् झाले. मात्र आपल्या घरट्याकडे आल्यानंतर या पक्षानं एकामागोमाग दोन्ही पिल्लांना आपल्या पोटातून बाहेर काढत चोचीतून घरट्यात सोडलं. एका फोटोग्राफरने हे सर्व दृश्य कॅमेरात कैद केलं आणि पाहणारे पाहतच राहिले.
अनेकांना नेमका हा काय प्रकार आहे याबद्दल शंका आहे किंवा प्रश्न पडलाय. तर यासंदर्भात निसर्गतज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या पक्षाने पिल्लांना गिळले नसून ते feeding behaviour आहे…या पक्षाची मादी घरट्यामध्ये बंद असते त्यामुळे हा पक्षी घरट्यातील मादीला किंवा नवजात पिल्ले झाली असतील त्यांच्यासाठी अन्न आणले आहे. त्या पक्षाने आणलेली शिकार आहे. एवढंच नाहीतर हा पक्षी कधी कधी काही बिया सुद्धा अशाप्रकारे साठवून ठेवतो. आपल्या पिलांना तो तेच खाऊ घालतो. त्यांचं ते खाणं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Amey_1986 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मात्र यावेळी कॅप्शनमध्ये युजर्सने “अचंबित करणारे मातृ आणि पितृ प्रेम… कमाल म्हणजे ३ पिल्लांपैकी २ पिल्लं आधी जिवंत गिळून आपल्या पोटात सुरक्षित ठेवून, ३ रं पिल्लू चोचीत घेऊन आला आणि नंतर पोटातील दोन्ही पिल्लं बाहेर काढून, हात नसतांना चोचीने सावरत, मातेला सुपूर्द केली.” असं लिहलं आहे. मात्र असं काहीही घडलेलं नाहीये कॅप्शनमध्ये दिलेली माहिती चुकीची आहे.