छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर केलेल्या आरोपांनंतर वाद निर्माण झाला असून नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. हा वाद इतका वाढला आहे की, नेटिझन्स कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. ट्विटरला सध्या #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिगला आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार, कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात ‘द काश्मीर फाईल्स’ या आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. आपल्या चित्रपटात कोणताही मोठा स्टार अभिनेता नसल्याने कपिल शर्मा शोने कार्यक्रमात प्रमोशन कऱण्याची विनंती फेटाळली असा विवेक अग्निहोत्रींचा आरोप आहे.

“ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप

विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या आरोपांनंतर ट्विटरवर कपिल शर्मा शो ट्रेडिंगमध्ये आहेत. नेटिझन्स चॅनेल आणि कपिल शर्माच्या निर्मात्यांवर टीका करत असून प्रमोशन करण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल शर्मा शो वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या कारणांमुळे हा कार्यक्रमा वादाला कारणीभूत ठरला आहे.

  • कपिल शर्माच्या कार्यकम्रात महिलांवर होणाऱ्या विनोदांवरुन नेहमी टीका होत असते. स्थूलपणापासून ते महिला कलाकारांच्या शारीरिक स्वरूपावर नेहमी होणारी टिप्पणी अनेकदा टीकेला आमंत्रण देणारी ठरली आहे. मात्र, असे विनोद नेहमी कार्यक्रमात होत असतात.
  • कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत विचारलेल्या एका प्रश्नामुळे नाराज झालेल्या अक्षय कुमारने बच्चन पांडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात हजर राहण्यास नकार दिला होता. नंतर कपिल शर्माने अक्षय कुमारसोबतचा वाद मिटल्याचं म्हटलं होतं.
  • सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यमांनी केलेलं कव्हरेज दाखवताना केलेला अॅक्टही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नव्हता. त्यावेळीही Boycott Kapil Sharma Show ट्रेंडिंगला होतं.
  • शक्तिमान साकारणारे मुकेश खन्ना यांनी एकदा कपिल शर्मा कार्यक्रम अत्यंत वाईट आणि घाणेरडा शो असून लोकांना हसवण्यासाठी अश्लीलता वापरतात असं म्हटलं होतं. महाभारतामधील सर्व अभिनेते कार्यक्रमात हजर असताना मुकेश खन्ना यांनी मात्र अनुपस्थित राहणं पसंत केलं होतं.
  • मार्च 2020 मध्ये प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात कपिलने एका देवतेचा उल्लेख केला होता. ज्यामुळे एका विशिष्ट समुदायाने नाराजी जाहीर केली होती. यानंतर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर कपिलने माफी मागितली होती