Viral video: आजकाल लाँग डिस्टन्स प्रेमाचे अनेक किस्से आपण एकतो. कधी लांब राहूनही लोक प्रामाणिक राहून आपल्या प्रेमाची वाट पाहतात तर कधी जवळ असूनही विश्वासघात करतात. त्यातच ऑनलाईन लव्हस्टोरीच्या अनेक चर्चा असतात. एक ताजं उदाहरण द्यायचं म्हंटलं तर सीमा हैदर, सीमा सचिनसाठी चक्क पाकिस्तानवरुन भारतात आली. त्यांचीही लव्हस्टोरीही ऑनलाईनच होती. दरम्यान सध्या अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ऑनलाईन गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच बघितल्यावर बॉयफ्रेंड थेट चक्कर येऊन पडला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय बघितलं त्यानं की त्याला चक्कर आली? तर हे तुम्हीच पाहा व्हिडीओमध्ये..
पहिल्यांदाच गर्लफ्रेंडला भेटायला आला बॉयफ्रेंड
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑनलाईन लव्हस्टोरी फुलली असताना बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदा भेटायला बोलावतो. यावेळी ती येतेही मात्र तिने चेहऱ्याला संपूर्ण स्कार्फनं झाकलेलं असतं. यावेळी बॉयफ्रेंड तिला चेहरा दाखवण्यास सांगतो. पण ती नकार देते. यावेळी एक व्यक्ती लांबून हे सगळं पाहत असतो. त्याला संशय आल्यामुळे तो त्यांच्या जवळ जातो आणि तिचा स्कार्फ जबरदस्तीनं काढतो. तेव्हा तिचा चेहरा बघून बॉयफ्रेंड तर चक्कर येऊन पडतोच पण तो व्यक्तीही चकीत होतो. कारण ती मुलगी नसून मुलीचा ड्रेस घालून आलेला मुलगा होता.
VIDEO पाहून व्हाल थक्क
याआधीही आपण अशी प्रकरणं एकली आहेत, ज्यामध्ये लोक मुलीच्या नावे फेक अकाऊंट उघडून फसवणूक करतात. त्यातलाच हा एक प्रकार. हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. कुणाच्या भावनांशी अशाप्रकारे खेळणं चुकीचं असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मराठा आरक्षणावर केतकीच्या पोस्टपेक्षा कमेंटचीच जास्त चर्चा; “ताई ५५ मोर्चे शांततेत काढले तेव्हा झोपला होतात का?”
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.