स्तनांना खाज सुटणे ही एक समस्या आहे जी महिलांसाठी अनेकदा त्रासदायक ठरते. खाज सुटल्याने महिलांच्या मनात संकोच निर्माण होतो आणि काहीवेळा दिवसभर अस्वस्थता जाणवते. तुम्हालाही अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. येथे स्तनांमध्ये खाज येण्याची काही संभाव्य कारणे आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपायांबद्दल सांगत आहोत. या टिप्स तुम्हाला संकोच आणि अस्वस्थ वाटणे टाळण्यास मदत करू शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

स्तनांना खाज का येते?

यामागे अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. जसे-

कोरडेपणा

विशेषतः थंडीच्या वातावरणात त्वचा अधिक कोरडी होते. अशा स्थितीत स्तनाच्या भागात पांढरे थर जमा होऊ लागतो. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही थंडी टाळण्यासाठी उबदार कपडे घालता, तेव्हा त्वचेमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे खाज सुटते आणि जळजळ होते. त्याचबरोबर उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने अशा प्रकारची समस्या वाढू शकते.

परफ्यूमचा जास्त वापर

परफ्यूमच्या अतिवापरामुळे देखील स्तनाच्या भागात खाज येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी शरीराच्या या भागावर परफ्यूम लावणे टाळावे. तसेच परफ्यूम थेट अंगावर न लावता कपड्यांवर शिंपडा.

हेही वाचा – चमचा वापरून १ मिनिटांत सोला डाळींब; जाणून घ्या काय आहे भन्नाट ट्रिक; Video होतोय व्हायरल

अस्वच्छ ब्रा

ब्रा नीट साफ न केल्यास स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा. तसेच, दररोज ब्रा बदला.

ओले अंतर्वस्त्र

काहीवेळा अंडरगारमेंट थोडे ओले राहिल्यासही असे होऊ शकते. एवढेच नाही तर एकदा तुम्ही ओले अंडरवियर घातले की, तुम्हाला अनेक दिवस स्तनांना खाज सुटू शकते. अशा परिस्थितीत ओले कपडे घालणे टाळावे.

हेही वाचा – इतरांच्या संपर्कात न राहणे, एकटेपणामुळे लठ्ठ होण्याचा धोका वाढतो का? जाणून घ्या काय सांगते संशोधन

साबण आणि डिटर्जंट

जर तुम्ही आंघोळीसाठी नवीन साबण वापरत असाल तर हे देखील स्तनात खाज येण्याचे कारण असू शकते. वास्तविक, शरीराचा हा भाग अधिक संवेदनशील असतो, त्यामुळे साबणातील रसायनांमुळे स्तनाग्राच्या भागात खाज सुटू शकते. तसेच कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिटर्जंटमुळेही असे होऊ शकते.

व्यायाम आणि घाम

बहुतेक महिला व्यायाम करताना घट्ट ब्रा घालतात, अशा स्थितीत जास्त घाम आल्याने खाज येण्याची समस्या वाढू शकते. एवढेच नाही तर या स्थितीत त्वचेला संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – आवळा-मध-काळी मिरी खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते का?; सद्गुरुंनी सुचवलेल्या उपायांबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

स्तनाच्या खाज सुटण्याच्या समस्येपासून मुक्त कसे व्हावे?

  • यासाठी दररोज आंघोळीनंतर हलके मॉइश्चरायझर वापरावे. विशेषतः स्तनाचा भाग कोरडा राहू देऊ नका.
  • आंघोळीचा साबण वेळोवेळी बदलत राहा आणि कपडे स्वच्छ करताना ब्रा विशेषतः साध्या पाण्याने अनेक वेळा धुवा. लक्षात ठेवा की, डिटर्जंट ब्रामधून पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे.
  • दररोज स्वच्छ ब्रा घाला आणि विशेषत: व्यायाम केल्यानंतर, स्तनाचा भाग स्वच्छ करा आणि ब्रा बदला.
  • गरम पाण्याने आंघोळ टाळा. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.
  • या सर्वांशिवाय खाज येण्याची समस्या वाढल्यास त्या भागाला खोबरेल तेलाने हलके मसाज करा. यातूनही तुम्हाला दिलासा मिळू शकतो. मात्र या सर्व पद्धतींचा अवलंब करूनही स्तनाच्या भागात खाज येण्याची समस्या कायम राहिल्यास त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.