सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ असे आहेत की ते पाहून प्रत्येकजण खूश होतो. पण अनेक वेळा तुम्ही सर्वांनी लग्नातल्या धमाल मस्तीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लग्नाच्या वधू-वरांसोबत झालेल्या अनेक मजेदार घटना पाहून तुम्हाला कधी हसू आवरणं अवघड होतं तर कधी भावूक होऊन डोळ्यातले अश्रु थांबण्याचं नाव घेत नाहीत. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो अगदी असाच आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही ‘बिचारे नवरा-नवरी’ असं उद्गार तुमच्या तोंडून काढल्याशिवाय राहणार नाही. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

एका नवरा-नवरीने त्यांच्या लग्नासाठी बनवलेला खास केक त्यांच्या डोळ्यादेखत पडला असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतंय. एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याच्या हातून त्यांच्या लग्नाचा केक पडला असून याचा त्या जोडप्याला मोठा धक्का बसतो. मात्र, काही मिनिटांनी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. त्या कर्मचार्‍यांच्या हातून पडलेला केक हा त्या नवरा-नवरीच्या लग्नाचा केक नव्हता. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी या नवीन जोडप्यासोबत केलेली ही एक छोटीशी मस्करी होती.

काही मिनिटांनंतर खरा वेडिंग केक त्यांच्यासमोर आणला गेला. त्यांच्या लग्नाचा केक कर्मचाऱ्यांच्या हातून पडल्यानंतर वधू-वरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरोखरंच पाहण्यासारखे होते. त्यांच्यासाठी हा एक हृदयस्पर्शी क्षण होता. प्रपोज, वेडिंग, एंगेजमेंट नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हायरल व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय.

आणखी वाचा : शाळेतील शिक्षकाचा डान्स पाहून हॉलिवूड स्टारही थक्क, पाहा २ कोटी लोकांनी पाहिलेला VIRAL VIDEO

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO: “तुम्ही दंड आकारू शकता…पण मारू शकत नाही!” ८ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने त्याला कानशिलात लगावली

या व्हायरल व्हिडीओमध्ये, वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या पोशाखात वेडिंग केक येण्याची वाट पाहताना दिसून येत आहेत. मात्र, तिथले कर्मचारी केक घेऊन आत येत असताना अचानक त्यांच्या हातून तो खाली पडतो. हॉटेलच्या कर्मचार्‍यांकडून केक चुकून पडला, हे पाहून जोडप्याला धक्काच बसतो. मात्र, काही मिनिटांनी मोठा खुलासा झाला. दुसरा माणूस लग्नाचा खरा केक घेऊन बाहेर पडतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास दिसून येतो. त्यानंतर या जोडप्याने केक कापून आपला विवाह मोठ्या थाटात साजरा केला.

आणखी वाचा : VIRAL : हे काय? चक्क एअरपोर्टवरच मॉडेलने न्यूड होऊन केलं असं काही की पाहून व्हाल हैराण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिलं, “देवाचे आभार, ही एक मस्करी होती!! आमच्या डोळ्यात जवळजवळ अश्रू आले होते.” हे गोंडस जोडपं शेवटी खूप आनंदी आणि नाचताना दिसले. व्हिडीओमध्ये दिसणारे हे जोडपेच नाही तर काही सोशल मीडियावरही कर्मचाऱ्यांच्या या प्रँकमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेनंतर वधू-वरांच्या चेहऱ्यावरील हावभावावर लोक आपल्या भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.