Viral video: सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय.
सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. कुटुंबीयांकडून काही दिवस डान्सचा सराव केला जातो आणि लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर सादर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून वधूच्या लग्नातील प्रवेशाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. अशातच नवरीने तिच्या मैत्रीणींसोबत लग्नात घोड्यावर बसून हलगीच्या तालावर ठेका धरत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता.हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी संभळीवर नवरी लग्नात थिरकली आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर akashnaik011 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.