मध्य प्रदेशातील कटनी शहरातील एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण अत्यंत क्रूर पद्धतीने मोराची पिसे काढताना दिसत आहे. या तरुणाचे कृत्य पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओतील तरुणाची ओळख पटली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी सध्या फरार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे –

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरुण अत्यंत निर्दयीपणे मोराला दाबत असून तो त्याची एकामागून एक पिसे उपटताना दिसत आहे. शिवाय त्याच्या आजूबाजूला मोराच्या पिसांचा ढीग लागल्याचं व्हिडिओत दिसत आहे. कॅमेऱ्याच्या दिशेने मोर दाखवत हा तरुण हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना अनेकांनी या घृणास्पद कृत्याबद्दल तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रील बनवण्यासाठी केलं विचित्र कृत्य –

हेही पाहा- बाजारात आली आहे ‘दारु विक्री मशीन’; ATM मधून पैसे येतात तशी बाहेर येणार दारुची बॉटल, पाहा Video

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तपास करत वनविभागाने तरुणाची ओळख पटवली आहे. अतुल कोहान्हे असे त्याचे नाव आहे. अतुलने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रील म्हणून अपलोड केला आहे. तर लोकांच्या लाईक्स मिळवण्यासाठी त्याने तो बनवल्याचं उघडकीस आलं आहे. दरम्यान, या तरुणाने मोराची पिसे उपटून त्याची हत्या केली आणि तो शिजवून खाल्ल्याचा आरोपही काही लोकांनी केला आहे. मात्र, त्याबाबतचे काही पुरावे मिळालेले नाहीत.

हेही पाहा- विराट कोहलीला अश्रू अनावर, शुबमनच्या शतकानंतर बॉटल उडवली आणि मग…, तो फोटो Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कटनीचे विभागीय वन अधिकारी (DFO) गौरव शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक आरोपी मोराशी अत्यंत क्रूरतेने वागत होता, जबरदस्तीने मोराची पिसे काढत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बाईकच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे तरुणाची ओळख पटली आहे. त्याच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ २० ते २५ दिवस जुना आहे. तर आरोपी तरुण कटनी जिल्ह्यातील रेठी पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असून तो गेल्या २० दिवसांपासून घरातून फरार असून त्याला अटक करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.