जग अतिशय पुढे गेलं आहे. जग चंद्रावर पोहोचलं आहे आणि दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती बनवण्यासाठी तयारीही करत आहे. मात्र आजही जगात असे अनेक लोक आहेत, जे माणुसकी मात्र शिकलेले नाहीत. रस्त्यावर एखादी व्यक्ती वेदनेत असेल आणि मदत मागत असेल तर लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवू लागतात. अशात कोणी कोणाची मदत करेल अशी आशाही करणं सोडून द्यावं लागतं. मात्र आजकाल प्राण्यांमध्येच माणुसकी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता पाहायला मिळाली आहे. यामध्ये वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क तीन म्हशींनी वाचवल्याची घटना राजापूर येथे घडली आहे.
राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचं काम सुरू असताना, एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली. अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या तीन म्हशींनीही लागलीच पाण्यात उड्या मारल्या. या म्हशींनी त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत, पलीकडील किनाऱ्यावर नेलं. पलीकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीनेही मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तिन्ही म्हशींकडे पाहिलं आणि ती गेली. त्यानंतर या तिन्ही म्हशी नदीपात्राच्या बाहेर आल्या.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या तीन म्हशींनीही पाण्यात उड्या मारल्या व त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत, किंबहुना तीनही बाजूंनी कव्हर करून पलिकडच्या किनाऱ्यावर नेले.पलिकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीने मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तिन्ही म्हशींकडे एक कटाक्ष टाकला व ती गेली. त्यानंतर या तिन्ही म्हशी नदीपात्राच्या बाहेर आल्या.
पाहा व्हिडीओ
प्राण्यांमधील माणुसकी हा एक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा विषय आहे. माणूस म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांकडे कसे बघतो, त्यांच्याशी कसे वागतो यावर खूप काही अवलंबून असते. अनेकवेळा, प्राणी एकमेकांना मदत करताना, प्रेम करताना किंवा कुटुंबासारखे वावरताना दिसतात, जे पाहून माणसांनाही प्रेरणा मिळते. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाईकही केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.