सोशल मीडियाची क्रेझ अशी आहे, की प्रत्येकाला त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय व्हायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. सध्या अशाच काही स्टंट व्हिडिओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. स्टंटसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जे पाहून इंटरनेट वापरकर्ते थक्क झाले आहेत. एक छोटीशी चूक अन् तरुणाचा जागीच जिव गेला असता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण इमारतीच्या रेलिंगवर स्टंटबाजी करत आहे. हा तरुण उभा असलेल्या इमारतीच्या बाजूलाच एक इमारत आहे. दोन्ही इमारतींमध्ये अगदी थोडसं अंतर आहे. या दोन इमारतींमधील अंतरात अतिशय कमी जागेत बॅकफ्लिप मारतो. मात्र पुढे जे होणार आहे याची या तरुणाला आणि व्हिडीओ पाहताना आपल्यालाही कल्पना नसते. हा तरुण बॅकफ्लिप मारतो आणि त्याचा हा स्टंट फसतो. तो थेट दोन्ही इमारतीच्या मधल्या गॅपमधून खाली पडतो. सुदैवानं या तरुणाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: लग्नात नवरदेवाला मित्रांनी गुपचूप पाजली दारु, नवरीला कळताच झालं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश युजर्सनी एकच प्रश्न विचारला आहे की, लोकांना जीव धोक्यात घालून काय मिळतं. काही लोकांनी असे धोकादायक स्टंट करू नका, असे आवाहनही केले आहे.