Man Found Gold Worth 7 Crore Buried In Garden: ज्याच्या नशिबी जे आहे ते त्याला मिळतंच अशी म्हण आपण बऱ्याचदा ऐकली असेलच. अनेकदा असं होतं की अचानक खूप मोठी लॉटरी लागते आणि असा काही खजिना हाती लागतो की त्याचा स्वप्नातही कधी विचार केला नसेल. असंच काहीसं घडलं आहे फ्रान्समधल्या एक व्यक्तीबाबत. ही व्यक्ती बागेत खोदकाम करत असताना जमिनीखाली त्याला एक पिशवी सापडली. आणि हा खरा खजिना होता.

फ्रान्समधील एक व्यक्ती बागेत खोदकाम करत होता. खोदकाम करताना त्याच्या हाती एक पिशवी लागली. त्याने ही पिशवी उघडून पाहिली असता तो अवाक झाला. हो, कारण यात होतं चक्क खरंखुरं सोनं. या गूढ खजिन्यात त्याला चक्क सोन्याचे बिस्किटं आणि नाणी सापडली आहेत. सोन्याची बिस्किटं आणि नाण्यांनी भरलेल्या पिशव्या जमिनीत पुरून ठेवण्यात आल्या होत्या. हा खजिना सापडल्यामुळे हा व्यक्ती काही क्षणात गडगंज श्रीमंत झाला आहे.

द इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये एक व्यक्ती त्याच्या घराच्या बागेत खोदकाम करत होता. तेवढ्यात त्याला सोन्याचा मोठा खजिना सापडला. जमिनीत अनेक पिशव्या पुरून ठेवण्यात आल्या होत्या. या पिशव्यांमध्ये बिस्किटं, नाणी होती. त्याला त्याच्या घराच्या आवारात या पिशव्या सापडल्याने ते सोनं आता त्याच्या मालकीचं झालं आहे. याप्रकरणात अधिक तपास केल्यानंतर हा खजिना त्या व्यक्तीच्या मालकीचा असल्याचा निर्णय घेण्यात आला.

फ्रान्समधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एक फ्रान्सच्या व्यक्तीला त्याच्या घराच्या बागेत स्विमिंग पूल बांधायच होता. त्यामुळे त्याने बागेत खोदकाम सुरू केले. याचवेळी त्या व्यक्तीला जमिनीत काहीतरी दिसून आलं. तिथे खूप पिशव्या पुरून ठेवलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्या पिशव्या बाहेर काढल्या आणि त्यात काय आहे हे पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. अर्थात हा आनंदाचा धक्का होता. या व्यक्तीला मिळालेल्या या सोन्याच्या खजिन्याची किंमत ७ लाख युरो म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल सात कोटी रूपये आहे.