सोशल मीडियावर अनेक भावनिक व्हिडीओ पाहायला मिळतात. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर जगात अजूनही माणुसकी शिल्लक असं प्रत्येक जण बोलत असतो. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. ज्यामध्ये एक कॅब ड्रायव्हर बदकाच्या पिल्लांना रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसत आहे. साधारणपणे बदकांची पिल्ले त्यांच्या आईमागे फिरताना दिसतात. बदकाची पिल्लं आपल्या आईच्या मागे रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पिल्लांच्या तुलनेत उंच कठडा आल्यावर त्यांना ते ओलांडता येत नव्हता.
बदकांच्या पिल्लांची तळमळ पाहून एक कॅब ड्रायव्हर मदतीसाठी पुढे येतो. बदकांना मदत कॅब चालक गाडी थांबवतो आणि त्या पिल्लांना मदत करतो. व्हिडीओमध्ये, कॅब चालक बदकाच्या पिल्लांना हाताने उचलून रस्ता ओलांडण्यास मदत करतो.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे. बदकाच्या पिल्लांना मदत करणाऱ्या कॅब ड्रायव्हरचे नेटकरी कौतुक करत आहेत.