Optical Illusion Test: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो दिवसेंदिवस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण त्याच त्याच गोष्टी इतक्या सरावाने करत असतो की मेंदूला आव्हानच दिले जात नाही. यामुळेच अनेकदा वेगळा विचार करण्याची कल्पकता कमी होऊ लागते. कालांतराने अगदी साध्या सोप्या गोष्टी सुद्धा आपल्या डोक्यात राहात नाहीत. अशावेळी ऑप्टिकल इल्युजनसारख्या चाचण्या या मेंदूला सक्रिय करतात. वेगळा दृष्टिकोन देतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातील निरीक्षण कौशल्य विकसित करण्यावर भर देतात. अलीकडे अनेक स्पर्धा परीक्षा व ऑफिस इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा ऑप्टिकल इल्युजन वर आधारित प्रश्न विचारले जातात. आज सुद्धा आपण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट पाहणार आहोत.
तर आजच्या आपल्या चाचणीमध्ये आम्ही एक फोटो आपल्याला दाखवणार आहोत. बर्फ़ाळ प्रदेशातील जंगलातील हा फोटो आहे हे तुम्हाला पाहताच लक्षात येईल. आता तुम्हाला या फोटोमध्ये काय दिसतंय हे सांगा. एक हिंट म्हणून सांगायचं झालं तर प्रथमदर्शनी या फोटोमध्ये एक मानून जंगलात पळत जाताना दिसतोय. पण तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की या फोटोमध्ये पळणारा माणूस नाही तर एक गोंडस प्राणी दिसतोय.
Optical Illusion: तुम्हाला या फोटोमध्ये पळणारा माणूस दिसतोय का?

हे ही वाचा<< Optical Illusion: तुम्हाला हत्ती दिसतोय, पण फोटोत लपलेले १० प्राणी शोधू शकता का? ९९% लोकं नापास
काहींनी हा फोटो पाहिल्यावर हा कुत्रा नसून अस्वल आहे असे म्हटले आहे तर काहींनी हा छान गोंडस काळ्या रंगाचा कुत्रा आहे पण कदाचित त्याला जास्तच झूम करुन दाखवण्यात आले आहे. तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर माणूस दिसला होता की कुत्रा? हे कमेंट करून नक्की कळवा.