Viral Video: सोशल मीडियावर रस्त्यावरील स्टंट किंवा अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे अपघात अनेकदा अनवधानाने होतात पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ओव्हरटेक केल्यामुळेही अनेकदा वाद होतात आणि याच वादाचं पुढे हाणामारातही रुपांतर होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका कार चालकाने रागाच्या भरात तरुणाला धडकून बोनेटवर टाकले आणि कार बराच वेळ पळवली.

नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कार चालकांचा शुल्लक कारणांवरुन वाद झाला दरम्यान वाद खूप वाढल आणि एकानं दुसऱ्याला कारच्या बोनेटवरुन एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं. या कारचा व्हिडीओ समोर आल्यावर पोलीसांनी या व्यक्तीला अटक केली. नोएडाच्या गढी चौखंडी भागात बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन कारमध्ये टक्कर झाली. त्यावरून दोन्ही गाड्यांच्या चालकांनी एकमेकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हल्ली शुल्लक गोष्टींवरुन वारंवार वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचमुळे कधी कधी निष्पाप बळी जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला चिमुकलीचा हात; आई मोबाईलमध्ये व्यस्थ, कळेपर्यंत चिमुकलीचा भयंकर शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@singhshakti1982 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. २२ सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी यावर संताप व्यक्त केला. पोलिसांनीही या व्यक्तीवर कारवाई केली आणि त्याला अटक केलीय. तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.