Viral Photo: दोस्ती क्या है? क्या है दोस्ती? या प्रश्नाचं उत्तर दोस्तहो, कुणाला देता आलंय का एका वाक्यात.शाळेत, आपल्याच बेंचवर बसून मोठा झालेला असतो तो, कुणी आपल्या शेजारी आपल्या ऑफिसच्या डेस्कशेजारीच डेस्क लावून बसतो,कुणी आपल्या बसमध्ये रोज असतो, कुणी येतो शेजारी अवचित राहायला. आणि मग प्रश्न पडतो की, इतकी वर्षे याच्याशिवाय कसं काय आपण जगत होतो आयुष्य? किती सहज आपण आपलं जगणं वाटून घेतलं त्याच्यासोबत? म्हणून म्हणतात मित्रांशिवाय आयुष्य नाही. अशाच एका पठ्ठ्यानं आपला मित्र पोलीस झाल्यानंतर त्याच्या कारवर असं काही लिहलं की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय.

ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका मित्रानं कारवर लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पठ्ठ्यानं आपला मित्र पोलीस झाल्यावर स्वत:च्या कारवर “पोलिसाचा मित्र” असं लिहलं आहे. हा फोटो पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा कोट्ससह कार ऑनलाइन व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अशा फनी कोट्समुळे अनेक वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत.