सोशल मीडियावर रोज एकतरी नवा व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतो. कधी कधी आश्चर्यचकीत करणारे, कधी हसता हसता रडवणारे, तर कधी कौशल्य दाखवणारे व्हिडिओ कायमच लक्ष वेधून घेतात. एखादा व्हिडिओ आवडला तर नेटीझन्स तो व्हिडिओ डोक्यावर घेतात. त्या व्यक्तीला रातोरात स्टार बनवतात. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. आता एका मांजराने डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आनंद घेत आहेत. फेसबुकवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तसेच त्याखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. खरं तर मांजराच्या हालचाली एक व्यक्ती करत आहे. असं असलं तरी मांजराच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदम डान्स करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. प्रत्येक स्टेप या बीटवर केल्या जात आहेत.

DJ Mag या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याखाली “मांजर वीकेंडसाठी तयार होत आहे”, अशी पोस्ट लिहिली आहे. ४६ सेंकदाचा हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की, अनेकांनी एकदा नाही तर दोन तिनदा पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक इतर सोशल मीडियावरदेखील शेअर करत आहेत.

Viral Video: आईने केलेला मेकओव्हर पाहून मुलगा झाला आवाक; म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेसबुकवर हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने लिहीलं आहे की, डान्स मायकल जॅक्सनपेक्षा भारी आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, डान्स पाहून मजा आली, खूपच छान नाचली आहे.