एकीकडे देशांत गोहत्येवरुन राजकिय वातावरण तापले आहे. गोहत्या आणि गोमांस खाल्ले म्हणून मारहाण करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत तर दुसरीकडे गायीच्या तस्करीची क्रुरता दाखवणारा भयानक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बांगलादेश सीमेवरचा असल्याचे समजते. गोमांसाला बांगलादेशातील बाजारात मोठी मागणी असल्यामुळे शेजारच्या देशातून किंवा भारतातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गायीची तस्करी बांगलादेशात केली जाते. अनेकदा हा प्रकार उजेडात आला आहे पण अद्यापही या तस्करीवर फारशी कडक कारावाई झाली नसल्याचे दिसते.
या व्हिडिओमध्ये काही तस्कर हे सीमेवर लावण्यात आलेल्या कुंपणापलिकडे उभे आहेत. गायींना क्रेनने बांधून त्यांना कुंपणापलीकडे अत्यंत आमानुषणे नेले जात आहे. काही मिनिटांत तस्कर कुंपणापलिकडून क्रेनचा वापर करत गायींना पळवून नेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ भारत बांगलादेश सिमेवरचा असल्याचे समजेत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधल्या काही वृत्त वाहिन्यांनी देखील हा व्हिडिओ दाखवून गायीच्या तस्करीचे भयानक वास्तव समोर आणले. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ युट्युबवर आहे. त्यामुळे गायीच्या तस्करीवर रोख लावण्याची मागणी केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2016 रोजी प्रकाशित
VIRAL VIDEO : अमानुषपणे गायींची तस्करी
क्रेनला गायींना अडकवून सीमेपलीकडे पाठवण्यात येते
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 27-09-2016 at 16:38 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cattle smuggling at bangladesh border