scorecardresearch

नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

७१ हजारांच्या स्कूटीसाठी चंदीगडच्या एका व्यक्तीने नंबर प्लेटवर १५ लाख रुपये खर्च केले आहेत.

honda-activa
प्रातिनिधिक फोटो (Honda)

हौसेला मोल नाही! अशी एक जुनी म्हण आहे. हौस म्हणून अनेकवेळा लोक असे काम करतात, ज्याबद्दल जाणून घेऊन लोक थक्क होतात. काही खाण्याचे शौकीन, तर काही प्रवासाचे शौकीन असतात. काहींना पैसे कमवण्याची, तर काहींना नाव कमवण्याची आवड असते. पण, एखाद्या व्यक्तीच्या हौसेबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण, केवळ ७१ हजारांच्या स्कूटीसाठी त्या व्यक्तीने नंबर प्लेटवर १५ लाख रुपये खर्च केले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

हे विचित्र प्रकरण चंदीगड सेक्टर २३ चे असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिजमोहन नावाचा ४२ वर्षीय व्यक्ती सध्या चर्चेत आहे. त्यांनी नुकतीच होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटी खरेदी केली, ज्याची किंमत ७१ हजार रुपये आहे. मात्र, या स्कूटीवर त्यांनी नंबर प्लेटसाठी त्याने १५ लाखांहून अधिक रुपये खर्च केले. बृजमोहन यांनी सांगितले की, मुलाच्या सांगण्यावरून त्यांनी १५.४ लाख रुपये देऊन हा नंबर खरेदी केला आहे. हा VIP क्रमांक CH01-CJ-0001 असा आहे. मात्र, ते लवकरच दुसरी गाडीही खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत, हा क्रमांक त्याच वाहनासाठी वापरला जाणार आहेत असही सांगतात.

(हे ही वाचा: वराने वरमाळा घालताच, वधूने मारली कानाखाली आणि…; Video Viral)

लिलावात केली होती खरेदी

अहवालानुसार, हा व्हीआयपी क्रमांक १४ ते १६ एप्रिल दरम्यान लिलावादरम्यान खरेदी करण्यात आला होता. एकूण ३७८ क्रमांकांसाठी १.५ कोटी रुपयांची बोली लागल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी ब्रिजमोहनने खरेदी केलेली नंबर प्लेट लिलावात सर्वात वर होती. या क्रमांकाची ५० हजारांची सुरुवातीची बोली लागल्यानंतर तो १५.४ लाख रुपयांना विकत घेण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandigarh man pays rs 15 4 lakhs for an activa worth rs 71 thousand ttg

ताज्या बातम्या