scorecardresearch

Premium

छत्रपती शिवाजी महाराजांची एकच गर्जना अन् येईल अंगावर काटा, विद्यार्थ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करताना गर्जना करताना दिसत आहे. तरुणाची शिवगर्जना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

shiv garjna by student viral video
छत्रपती शिवाजी महाराजांची एकच गर्जना अन् येईल अंगावर काटा (Photo : Instagram/ shreeraj_45_sawant)

Viral Video : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण गड किल्लांवर जाऊन महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. शिवप्रेमीं मनापासून शिवगर्जना करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करताना गर्जना करताना दिसत आहे. तरुणाची शिवगर्जना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका महाविद्यालयातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अनेक तरुण मंडळी घोळका करून उभी आहेत.अचानक एक तरुण शिवगर्जना करायला सुरूवात करतो. शिवगर्जना करताना हा तरूण म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराज की..” त्यावर बाकीचे तरुण मोठ्याने जय म्हणतात त्यानंतर तो तरुण पुन्हा म्हणतो, ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की..” त्यावर सुद्धा बाकीचे तरुण मोठ्याने जय म्हणतात. शेवटी हा तरुण हर हर महादेवचा दोनदा जयघोष करतो. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल.

a dog sleeping in the shade of a bhagva zenda of chhatrapati shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्र आमच्या डोक्यावर आहे! भगव्या झेंड्याच्या सावलीत झोपलेल्या कुत्र्याचा Video Viral
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Marathi News
सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमान अन् छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना, पाहा VIDEO
Chandgad BJP
कोल्हापूर : चंदगडमध्ये भाजपचा अजितदादा गटाला शह; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणातून राजकीय नाट्य रंगले
Construction of shelter room for relatives of patients in Kolhapur
कोल्हापुरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची इमारत साकारली; वास्तुविशारदाच्या संघर्षाची सफल कथा

हेही वाचा : VIDEO : मेट्रोचं दार बंद होणार अन् चोराने डाव साधला! क्षणात हिसकावला मोबाईल; बिचारा तरुण पाहातच राहिला

shreeraj_45_sawant या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “छत्रपती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आला भावा… जय शिवराय, जय शंभूराजे.. हर हर महादेव..” तर एका युजरने लिहिलेय, “आवाज खूप पहाडी आहे.. एकदम भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा उभा राहिला. डोळ्यात पाणी आणलं राव. खरच जय शिवराय दादा”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj shiv garjna by student viral video on social media ndj

First published on: 08-12-2023 at 15:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×