बादशाहसोबत गाण्याची संधी ते मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; ‘बचपन का प्यार’मुळे रातोरात झाला सुपरस्टार

पाचवीच्या वर्गात शिकत असतांना सहदेवने ‘बचपन का प्यार …’ हे गाणे गायले होते. जेव्हा तो इयत्ता आठवीत आला तेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.

bachpan ka pyaar sukhdev meets CM
'बचपन का प्यार …' हे गाणे मूळचे गुजरातच्या कमलेश बरोट यांनी गायले होते.

सोशल मीडियावर जास्त लोकांना जे आवडेल ते सहज व्हायरल होतंं. एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याचाचं ट्रेंण्ड येतो आणि प्रत्येक मंचावर तेच दिसू लागतं. सोशल मीडियामुळे रातोरात स्टार बनून अनेकांची करिअरसुद्धा घडली आहेत. असाच एक ट्रेंण्ड अनेक दिवसापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘’बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे..’ हे गाण एक छोटा मुलगा गातानाचा हा व्हिडीओ आहे. या मुलाला त्याच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार बनवलं आहे. त्याने नुकतच बॉलिवूडचा रॅपर, गायक बादशाहबरोबर गाणं रेकॉर्ड केलं आहे. तसेच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही या मुलाचे स्वतः व्हिडिओ पोस्ट करत कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकीची थाप

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील बाल गायक सहदेव यांने मंगळवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. यावेळी सहदेवनी आपले हिट गाणे ‘बचपन का प्यार’ मुख्यमंत्र्यांनाही प्रत्यक्ष गाऊन दाखवले. रातोरात सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सहदेवला मुख्यमंत्र्यांनीचं भेटायला बोलवले होते. बॉलिवूडचा रॅपर, गायक बादशाहबरोबर सहदेवने गाणं रेकॉर्ड केले आहे. याबद्दलही त्याचे कौतुक करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री कावासी लख्मा सहदेवला घेऊन यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. बैठकीनंतर बघेल यांनी सहदेव च्य गाण्याचे कौतुक केले आहे. ‘बचपन का प्यार….वाह! लिहित मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

३ वर्षापूर्वीचं गायले होते गाणे

पाचवीच्या वर्गात शिकत असतांना सहदेवने ‘बचपन का प्यार …’ हे गाणे गायले. जेव्हा तो इयत्ता आठवीत आला तेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. जेव्हा व्हायरल व्हिडिओ सिंगर बादशहापर्यंत पोहोचला तेव्हा त्याने व्हिडिओ कॉलद्वारे सहदेव यांच्याशी बातचीत केली. आपण आता एकत्र गाऊ या, असे बादशहाने सहदेवला सांगितले. यानंतर या दोघांनीही एकत्र गाणे रेकॉर्ड केले.

कमलेश बारोट यांचे गाणे’

‘बचपन का प्यार …’ हे गाणे मूळचे गुजरातच्या कमलेश बरोट यांनी गायले होते. सहदेव पाचवीत शिकत असताना शिक्षकांनी गाणे गायला  सांगितले होते. तेव्हा त्याला या गाण्याची आठवण झाली. यादरम्यान, कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनविला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन वर्षांनंतर सहदेव प्रसिद्ध झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhattisgarh cm bhupesh baghel meets bachpan ka pyar fame sukma sahdev ttg